Political News : "६२ हजार द्या, २ तासांत परत करते"; काँग्रेस खासदाराचा मोबाईल हॅक, महाराष्ट्रात खळबळ

Maharashtra Political News : धुळ्यात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल हॅक करण्यात आला. त्यांच्या नावाने व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून ६२ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. प्रकरणी सायबर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
dr shobha bachhav mobile hacked news
dr shobha bachhav mobile hacked newsSaam Tv
Published On
Summary
  • धुळ्यात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल हॅक

  • त्यांच्या नावाने व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून ६२ हजार रुपयांची मागणी

  • सायबर पोलिसांत तक्रार दाखल

अभिजित सोनावणे, नाशिक

अलीकडे सायबर चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. मात्र आता या सायबर चोरट्यांच्या तावडीत चक्क काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या अडकल्या आणि एकच खळबळ उडाली. धुळ्यातील काँग्रेस नेत्या डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल हॅक करण्यात आला. मोबाईलचा गैरवापर करत अज्ञात व्यक्तींनी खासदार बच्छाव यांच्या नावाने त्यांच्या कुटुंबियांसह अनेकांना व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून तब्बल ६२ हजार रुपयांची मागणी केली. हा प्रकार लक्षात येताच डॉ. बच्छाव यांनी तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. शोभा बच्छाव यांचा फोन हॅक झाल्यानंतर त्यांच्या नावाने अनेकांना व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवण्यात आले. या मेसेजमध्ये, “माझ्या खात्यात ६२ हजार रुपये जमा करा, मी दोन तासांत परत करेन,” अशी मागणी करण्यात आली होती. खासदारांच्या नावानेच हा मेसेज आल्याने काही जणांनी त्यावर विश्वास ठेवण्याची शक्यता निर्माण झाली होती.

dr shobha bachhav mobile hacked news
Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी ३० दिवस आधी शरीरात दिसतील 'ही' ६ लक्षणे; दुर्लक्ष करू नका नाहीतर....

मेसेज करून पैशांची मागणी

दरम्यान, बच्छाव यांच्या संपर्कातील काही व्यक्तींना संशय आल्याने त्यांनी थेट खासदारांशी संपर्क साधला. त्यानंतर आपल्या मोबाईलचा गैरवापर होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कोणतीही आर्थिक फसवणूक होऊ नये, यासाठी त्यांनी वेळ न दवडता सायबर पोलिसांना याबाबत माहिती दिली. तक्रार मिळाल्यानंतर सायबर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल रिस्टार्ट करण्यात सायबर पोलिसांना यश आले.पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

dr shobha bachhav mobile hacked news
Fatty Liver : तुम्हाला सतत थकवा जाणवतोय, भूक लागत नाही? फॅटी लिव्हरची 'ही' लक्षणे दुर्लक्ष करू नका, नाहीतर...

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या घटनेमुळे सोशल मीडिया आणि मोबाईल खात्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः परिचित व्यक्तीच्या नावाने पैशांची मागणी करणारे मेसेज आल्यास त्यावर तातडीने विश्वास ठेवू नका. तसेच अशा प्रकारचे संशयास्पद संदेश किंवा आर्थिक मागणी आल्यास तात्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com