Ashok Kharat Case: उपजिल्हाधिकारीचं निलंबन; भोंदू बाबा खरात प्रकरणाशी काय आहे कनेक्शन?

Deputy Collector Abhijeet Bhande Patil Suspended: उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. नाशिकमधील जमिनीच्या सातबाऱ्यावर भांडे यांच्या पत्नीचे आणि अशोक खरातच्या मुलीचे नाव आढळल्याने कारवाई करण्यात आली आहे.
Deputy Collector Abhijeet Bhande Patil Suspended:
Deputy Collector Abhijeet Bhande Patil has been suspended in connection with the Ashok Kharatsaam tv
Published On
Summary
  • अशोक खरात प्रकरणात उपजिल्हाधिकारी निलंबित.

  • सातबाऱ्यावर नाव आढळल्यानंतर कारवाई.

  • महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले आदेश.

उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांना अशोक खरात प्रकरण भोवलं आहे. भोंदू बाबा खरात प्रकरणात नाव आल्यानंतर आधी भांडे यांची बदली करण्यात आली होती. आता थेट त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भांडे यांच्या निलंबनाचे आदेश दिलेत. भोंदू बाबा आणि उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे यांचे काय कनेक्शन काय आहे हे जाणून घेऊ.

नाशिकमधील पाथर्डी शिवारातील 40 गुंठे जागेच्या सातबाऱ्यावर भांडेंची पत्नी आणि अशोक खरातच्या मुलीचे नाव असल्याचे आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या अशोक खरातमुळे रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक राजकारणी अडचणीत आलेत. चाकणकर यांची ईडीकडून चौकशी केली जातेय. आता उपजिल्हाधिकारांना निलंबित करण्यात आले आहे.

Deputy Collector Abhijeet Bhande Patil Suspended:
खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची पहिल्यांदाच SIT चौकशी, IPS सातपुतेंनी ६ तासांत काय-काय विचारलं?

अशोक खरातशी असलेले संबंध समोर आल्यानंतर अभिजीत भांडे यांचे आधी बदली करण्यात आली होती. अशोक खरातच्या मुलीच्या आणि पत्नीच्या नावे असलेल्या जमिनीमध्ये गुंतवणूक केल्याप्रकरणी भांडे यांचे निलंबन करण्यात आले. खरात प्रकरणात अजून काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे का? याचा तपास केला जातोय. अशोक खरातशी संबंधित अनेक कामांमध्ये अभिजीत भांडे पाटील यांची गुंतवणूक असल्याचा आरोप होता. आता त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर खरातशी संबंधित इतर महसूल अधिकाऱ्यांचे धाबे दणाणल्याची चर्चा आहे.

Deputy Collector Abhijeet Bhande Patil Suspended:
'तुझा संतोष देशमुख करून टाकू...'; बीडमध्ये गावगुंडांकडून किर्तनकार महाराजाला अमानुष मारहाण, Video Viral

रुपाली चाकणकर यांची ईडीकडून आठ तास चौकशी

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात अडचणीत आलेल्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची आज ईडीकडून चौकशी करण्यात आली. ईडीने आर्थिक व्यवहार प्रकरणी तब्बल आठ तास चौकशी केली. या चौकशीनंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी रुपाली चाकणकर यांनी संवाद साधला.

जेव्हा जेव्हा आम्हाला चौकशीसाठी बोलावलं गेलं तेव्हा आपण उपस्थित राहिलो. यापूर्वी अनेक बातम्यांचा विपर्यास केला गेला चुकीच्या बातम्या पसरवल्या गेल्या असं चाकणकर म्हणाल्या. आज सकाळी ११ ते ७ वाजेपर्यंतच्या वेळेत चार साडेचार तासांची चौकशी झाली. त्यांच्या सगळ्या प्रश्नांना आपण उत्तरं दिल्याचं त्या म्हणाल्या. खरात प्रकरणात खरातशी आमचा कुठलाही आर्थिक व्यवहार नव्हता. कुठल्याही जमिनीच्या व्यवहारात आम्ही पार्टनर नव्हतो, त्यामुळं खरंतर बाकीचे प्रश्नच उद्भवत नसल्याचे चाकणकर म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com