

गेवराईजवळ कीर्तनकार महाराजांवर जीवघेणा हल्ला.
लोखंडी रॉड, केबल वायर, कोयता, चाकू, शॉकअप आणि लाकडी दांडक्यांनी किर्तनकाराला मारहाण
घटनेनंतर बीडमधील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह.
'आम्हाला सप्ताहाचा हिशोब विचारतो, तुझा संतोष देशमुख करून टाका' असं म्हणत बीडच्या गेवराई शहराजवळ एका कीर्तनकार महाराजाला गावगुंडांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. बीडमधील गुंडाराज अजूनही कायम आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचा हिशोब विचारल्याच्या कारणावरून गेवराई शहराजवळ पाच ते सात गावगुंडांनी किर्तनकार कैलास राजेंद्र आनंदे महाराज यांना मारहाण केली.
गावगुंडांनी महाराजांना लोखंडी रॉड, केबल वायर, कोयता, चाकू, शॉकअप, लाकडी दांडक्यांनी अमानुष मारहाण केली. या मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. काल सकाळी १० ते १०.१५ वाजता गेवराई शहरात जातेगाव रोडवर गावगुंडांनी किर्तनकार महाराज कैलास आनंदे यांना वाटेत गाठलं आणि त्यांना अमानुष मारहाण केली.मारहाणीत महाराज गंभीर जखमी झाले असून त्यांना बीड शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाहीये.
हाती आलेल्या माहितीनुसार,कैलास आनंदे महाराज हे स्वानंद सेवा हे गुरूकूल चालवतात. कैलास आनंदे महाराज यांनी जोग महाराज वारकरी संस्था आळंदी येथुन वारकरी सांप्रदयाचे शिक्षण घेऊन ग्रामीन भगात वारकरी शिक्षण देण्याचे कार्य करीत आहेत. या मारहाणीनंतर किर्तनकार महाराजांच्या वडिलांनी माध्यामांना प्रतिक्रिया दिली आहे. गावात आमचे एकटेच घर आहे. त्या लोकांची दहशत आहे. आम्हाला गावात राहणे देखील अवघड झाले आहे.
या प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी कठोर कारवाई करावी, अन्यथा आमचे गावात राहणे देखील कठीण होईल असं सांगताना किर्तनकार कैलास आनंद यांची वडील राजेंद्र आनंदे यांना रडू कोसळलं. गावातील गावगुंडांनी शासकीय दूध डेअरी जवळ अडवलं. त्यानंतर त्यांनी माझ्यावर हल्ला चढवला. आम्हाला सप्ताहाचा हिशोब विचारतो का असं म्हणत मला मारहाण केली.गुप्ती, रॉड , केबल, कोयते, कुऱ्हाडीने मारहाण केली.
जर आता परत आम्हाला हिशोब विचारला तर तुझा आम्ही संतोष देशमुख करू अशी धमकीही गावगुंडांनी दिली, अशी माहिती किर्तनकार कैलास राजेंद्र आनंदे यांनी दिली. दरम्यान बीडमधील गुंडाराज अजूनही कायम आहे. गावगुंडांनी जिल्ह्यात धुडगूस घातला आहे. दररोज हाणामारीच्या घटना होत असल्याचे वृत्त वाचण्यात येत असून तेथील कायदा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.