

रणजीत माजगावकर, कोल्हापूर प्रतिनिधी
minor girl viral video case Kolhapur : प्रियकर फोन उचलत नाही आणि टाळाटाळ करतो, या रागातून एका अल्पवयीन मुलीने टोकाचे पाऊल उचलत स्वतःचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात घडली आहे. शिरोळ पोलिसांनी याप्रकरणी संबंधित युवकावर 'पोक्सो' (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. दरम्यान, हे व्हिडीओ त्या मुलीने स्वतःच अपलोड केले आहेत की अन्य कोणी बनावट (Fake) अकाऊंटद्वारे व्हायरल केले आहेत, याचाही पोलीस सखोल तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरोळ तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी आणि संबंधित युवक यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात बिनसले होते. प्रियकर आपला फोन उचलत नसल्याने संतापलेल्या मुलीने रागाच्या भरात स्वतःकडील तीन अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर सार्वजनिक केले. हे व्हिडीओ वाऱ्यासारखे व्हायरल झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली.
लॉज मालक पोलिसांच्या रडारवर
हे व्हिडीओ ज्या ठिकाणी चित्रित करण्यात आले, त्यावरून तपासाची चक्रे फिरली आहेत. हे कृत्य हातकणंगले तालुक्यातील एका लॉजवर घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे शिरोळ पोलिसांनी संबंधित लॉज मालकाला चौकशीसाठी पाचारण केले आहे. नियमांचे उल्लंघन करून अल्पवयीन मुला-मुलीला प्रवेश कसा दिला, यावरून लॉज मालकावरही कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.
या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून सोशल मीडियाचा घातक वापर आणि अल्पवयीन मुलांमधील वाढती गुन्हेगारी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. याबाबत शिरोळचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्याकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, "पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असल्याने पीडितेची ओळख आणि घटनेची अधिक माहिती सार्वजनिक करता येणार नाही," असे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.