राजकारणात मोठी खळबळ, २५ आमदारांची पक्षातून हकालपट्टी, कारण काय ?

तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या विश्वासदर्शक ठरावाला पाठिंबा दिल्यामुळे AIADMK ने २५ आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली.

थलपती विजय यांच्या टीव्हीकेनं एकतर्फी विजय मिळवत तामिळनाडूमध्ये सत्तास्थापन केली. बुधवारी विजय यांनी बहुमतही सिद्ध केले. पण त्यानंतर तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. AIDMK नं आपल्या २५ आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान या आमदारांनी पक्षाचा 'व्हीप' झुगारून सरकारला पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

या बंडखोरीनंतर सरचिटणीस एडप्पाडी के. पलानीस्वामी यांनी कडक पावले उचललीत. हकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये एस.पी. वेलुमणी आणि सी.व्ही. षण्मुगम यांसारख्या बड्या नावांचा समावेश आहे. पक्षानं आता या आमदारांविरुद्ध पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्रतेची मागणी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com