Sunetra Pawar Resignation : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा

Sunetra Pawar Resign From Rajya Sabha: महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे सादर केला.
Deputy Chief Minister Sunetra Pawar submits her resignation from the Rajya Sabha to Vice President C.P. Radhakrishnan.
Deputy Chief Minister Sunetra Pawar submits her resignation from the Rajya Sabha to Vice President C.P. Radhakrishnan.saam tv
Published On

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा उपराष्ट्रपती सी.पी राधाकृष्णन यांच्याकडे सोपवला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या बारामतीतील पोटनिवडणूकीचा निकाल जाहीर झाला. यामधी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय झाला. यानंतर त्यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला. आज सकाळीच त्या दिल्लीमध्ये दाखल झाल्या होत्या. उपराष्ट्रपती सी.पी राधाकृष्णन यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला.

Deputy Chief Minister Sunetra Pawar submits her resignation from the Rajya Sabha to Vice President C.P. Radhakrishnan.
राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट! 5 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

4 मे रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या दोन महत्वपूर्ण पोटनिवडणूकांचे निकल जाहीर झाला. यामध्ये बारामतीमध्ये ऐतिहासिक निकाल लागला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या या मतदारसंघात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी दणदणीत विजय मिळवत मोठ्या मताधिक्यांनी त्या निवडून आल्या. या विजयानंतर त्यांना आमदारकी मिळाली आहे, यामुळे त्यांना खासदार हे पद सोडावे लागले.

Deputy Chief Minister Sunetra Pawar submits her resignation from the Rajya Sabha to Vice President C.P. Radhakrishnan.
Amrut Bharat Express: अयोध्या ते मुंबई अन् वाराणसी ते पुणे अमृत भारत एक्सप्रेस धावणार, कोण-कोणत्या स्टेशनवर असणार थांबा? वाचा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी २ लाख १८ हजार ९३० मते मिळवत अभूतपूर्व विजय संपादन केला आहे. या विजयासह त्यांनी २०१९ मध्ये अजित पवारांनी प्रस्थापित केलेला मताधिक्याचा विक्रम मोडीत काढला असून बारामतीत एक नवा इतिहास रचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com