Wardha News : वर्धेतील बॅंकेच्या १ कोटी २१ लाख १६ हजार रुपयांवर सायबर चाेरट्यांचा डल्ला

सायबर सेलच्या माध्यमातून तपास केला जात आहे.
wardha, cyber crime news
wardha, cyber crime newssaam tv

- चेतन व्यास

Wardha Crime News : सायबर चाेरट्यांनी वर्धा नागरी बँकेची (wardha nagari sahakari adhikosh bank) येस बॅंकेची युटिलीटी हॅक करुन तब्बल १ कोटी २१ लाख १६ हजार रुपयांच्या रक्कमेवर डल्ला मारला आहे. ही रक्कम विविध खात्यात परस्पर पद्धतीने वळवली गेल्याचे सांगितले जात आहे. या सायबर हल्ला प्रकरणी बॅंकेने पाेलिसांत तक्रार नाेंदवली आहे. वर्धा शहर पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत. (Maharashtra News)

wardha, cyber crime news
Rajula Hidami Success Story : दादा, मला पाेलिस व्हायचे आहे ! वाचा, माओवादी छावणीतून सुटका ते बारावीपर्यंतचा राजूला हिदामीचा प्रवास

वर्धा नागरी सहकारी अधिकोष बॅंक ही वर्धा जिल्ह्याची एक नावाजलेली बॅंक असून अनेक नागरिकांची बॅंक खाती वर्धा नागरी बॅंकेत आहेत. मात्र, बॅंकेकडे निफ्टी व आरटीजीएस व्यवहाराची सुविधा नसल्याने वर्धा नागरी बॅंकनेने येस बॅंकेशी संलग्नता घेतली आहे. येस बॅंकेतील खात्यातून वर्धा नागरी बॅंकेचे आरटीजीएस व निफ्टीचे व्यवहार होत असतात.

wardha, cyber crime news
Pune Bangalore National Highway Accident News : राेड राेलरला कारची धडक; पुणे-बंगळुर महामार्गावर दाेन ठार, चाैघे जखमी

२४ मे रोजी बुधवारी बॅंक बंद असताना पहाटे ६ ते सकाळी ८ या वेळेत येस बॅंकेची युटिलीटी सायबर चाेरट्यांनी हॅक करुन पैस लुटले. यामध्ये वर्धा नागरी बॅंकेच्या खात्यातून तब्बल १ कोटी २१ लाख १६ हजारांची रक्कम विविध खात्यात वळती केली. सकाळी बॅंक उघडल्यावर सर्व संगणक सुरु करुन तपासणी केली असता कर्मचाऱ्यांना ही बाब लक्षात आली.

सायबर चाेरट्यांनी सकाळी ६.०७ ते ८.२६ मीनिटांपर्यंत एकूण २४ विविध खात्यात ही रक्कम वळती केल्याचे दिसले. मात्र, याच्या नोंदी कोअर बॅंकींग प्रणालीत दिसून आल्या नसल्याने येस बॅंकेची युटिलीटी हॅक करुन वर्धा नागरी बॅंकेच्या खात्यातील रक्कम सायबर चाेरट्यांनी वळती केल्याचे समजले.

wardha, cyber crime news
Gautami Patil Rapchik Dance : पाटलांचा बैलगाडा...सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम..., गाैतमीच्या रापचीक डान्सनं तरुणाई घायाळ

याप्रकरणी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांचन अनिल केळकर यांनी याबाबतची तक्रार वर्धा शहर पोलिसात नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सायबर सेलच्या माध्यमातून केला जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com