Gautami Patil Rapchik Dance : पाटलांचा बैलगाडा...सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम..., गाैतमीच्या रापचीक डान्सनं तरुणाई घायाळ

Sabse Katil Gautami Patil : हा कार्यक्रम शातंतेत पार पडल्याने आयोजकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
Gautami Patil , Sangli, Kadepur
Gautami Patil , Sangli, Kadepursaam tv

Gautami Patil News : सबसे कातील गाैतमी पाटील (gautami patil) अशी आपल्या नृत्यातून महाराष्ट्रात युवा वर्गात छाप पाडलेल्या नृत्यांगणा गाैतमी पाटीलचा सांगलीतील कडेपूर येथील शाे शांततेत पार पडला. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला युवा वर्गाने तुफान गर्दी केली हाेती. नेहमीच गाैतमीच्या कार्यक्रमात वादविवाद हाेत असल्याचे सर्वांनीच पाहिले परंतु कडेपूरवासियांनी तिच्या कार्यक्रमाची मजा लुटली ती ही काेणत्याही गाेंधळाविना. (Maharashtra News)

Gautami Patil , Sangli, Kadepur
Tiroda Accident News : तिराेड्यात अपघात, शिक्षिकेच्या मृत्यूने विद्यार्थी हळहळले

सांगली जिल्ह्यातील कडेपूर मध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख (sangramsinh deshmukh) यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला गौतमीच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमाला युवकांची तुफान गर्दी झाली हाेती.

Gautami Patil , Sangli, Kadepur
Sanjay Raut लाेकांना Confuse करतात : दीपक केसरकर

कडेपूर, कडेगावसह अन्य तालुक्यातील प्रेक्षकांनी आणि गौतमीच्या चाहत्यांनी या कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. कडेपूर मधील खुल्या पटांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमात कोणताही गोंधळ, हुल्लडबाजी झाली नाही. युवा वर्गासह ज्येष्ठांनी देखील गाैतमीच्या अदाकरींना दाद दिली. हा कार्यक्रम शातंतेत पार पडल्याने आयोजकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com