भर रस्त्यात ऐटीत मगर चालत तुमच्या समोर आली तर तुमची पाचावर धारण बसल्याशिवाय राहणार नाही. अशीच काहीशी परिस्थिती चिपळूणकरांची झाली. चिपळूण शहरातील चिंचनाका परिसरात महाकाय मगर ऐटीत रस्त्यावर चालत आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. मगरी नागरी वस्तीत दिसत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.
चिपळूणमधील मगरीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना रविवारी रात्री घडली. या घटनेनं प्रत्यक्षदर्शी मात्र घाबरुन गेले होते. त्यामुळे चिपळूणमधील मगरींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलायं. प्रशासनानं मगरी नदीपात्र सोडून शहरात पोहोचणार नाहीत यासाठी उपाययोजन करण्याची मागणी जोर धरतेय.
सांगली आणि रत्नागिरीत मगरींचा मुक्त वावर नेहमीच पाहायला मिळतो. सांगलीतील कृष्णा नदी पात्रातून मगरी नजीकच्या शेतात किंवा रस्त्यावर आल्याच्या अनेक घटना घडल्यात. चिपळूणमधील शिव नदीतही मगरींचा वावर प्रचंड आहे. पावसाळ्यात अनेकदा या मगरी शहरात मानवी वस्तीमध्ये वावरता दिसून येत असतात. शहरात यापूर्वी गोवळकोट भागात मगर आढळली होती.. आता चिंचनाका परिसरात मगर आढळलीये.
दरम्यान याप्रकरणी चिपळूणच्या वनाधिकारी गिरीजा देसाई यांनी नागरिकांना घाबरुन न जाता वन विभागास संपर्क साधण्याच्या सूचना केल्यात.पावसाळ्यात साप चावल्याच्या अनेक घटना समोर येतात.मात्र नदीपात्रातून मगरी चक्क रस्त्यावर येत असल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय. सांगली,रत्नागिरीसाऱख्या घटनांची लागलीच दखल घेऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा हे प्रकार माणसांच्या जीवावर बेतू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.