रणजीत माजगावकर, कोल्हापूर
कोल्हापूरच्या वारणा नदीकाठी चिकूर्डे बंधाऱ्याशेजारी सात फुटांची मगर आणि तिचे पिल्ले आढळले आहेत. मगरीचा नदीकाठी बिनधास्त वावर वाढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. यामुळे नागरिकांनी या मगरीचा तातडीने बंदोबस्त करावा,अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कोल्हापुरातील वारणा नदीत मगरीचे वास्तव्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. नदीपात्र सोडून मोकळ्या जागेत मगर वावरताना दिसत आहेत. बंधाऱ्यावरून रस्ता पार करताना ही मगर निदर्शनास आली आहे. ही मगर दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच भीती पसरली आहे.
कोल्हापुरातील वारणा नदीकाठी चिकूर्डे बंधाऱ्याशेजारी सात फुटांची मागर आढळली. या मगरीसोबत तिच्या पिलांचा वावर पाहायला मिळाला. ही भलीमोठी मगर याच बंधाऱ्यावरून रस्ता पार करताना निदर्शनास पडली. एवढ्या मोठ्या मगरीचा परिसरात वावर असल्याने शेतकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच याशिवाय याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कोल्हापुरातील सादळे-कासारवाडी परिसरात सुमारे 20 गव्यांचा कळप समोर आला आहे. गव्यांचा कळप अनेक तासांपासून या भागातच होता. त्यामुळे गव्यांचा हा कळप पाहण्यासाठी घाटात स्थानिक नागरिक व पर्यटक गर्दी केली होती. तर काही अतिउत्साही नागरिक जीवावर उदार होऊन कळपाच्यामागे धावत असतानाही पाहायला मिळाले.
उन्हाळ्याची चाहूल लागताच यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्याकडे पर्यटकांचे पावले वळत आहेत. याचवेळी सफारीमध्ये तलाववाली वाघीण (T2) नावाने परिचित असलेली वाघीण आपल्या तीन बछड्यासह फिरत मुक्त संचार करताना पर्यटकांना दर्शन झाले.
काही पर्यटकांनी या वाघीणीला कॅमेरात कैद केलं आहे. या अभयारण्यत हमखास दर्शन होत असल्याने पर्यटकांना टिपेश्वरची भुरळ पडली आहे. यवतमाळ जिल्ह्यासह मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यातील पर्यटकांची गर्दी वाढत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.