Crime: वर्षभरापूर्वी लग्न, नवऱ्याचे अनैतिक संबंध; मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या बायकोची आत्महत्या, संभाजीनगर हादरले

Sambhajinagar Crime: संभाजीनगरमध्ये विवाहितेने आत्महत्या केली. राहत्या घरी गळफास घेत तिने आयुष्य संपवले. ही महिला संभाजीनगरमधील प्रसिद्ध मृदंगाचार्य लघाणे महाराजांची बायको होती. आत्महत्येमागचे कारण समोर आले.
Crime: वर्षभरापूर्वी लग्न, नवऱ्याचे अनैतिक संबंध; मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या बायकोची आत्महत्या, संभाजीनगर हादरले
Sambhajinagar Crimesaam tv
Published On

Summary -

  • संभाजीनगरमध्ये नवविवाहित महिलेची आत्महत्या

  • नवऱ्याच्या छळला कंटाळून आत्महत्या

  • नवऱ्याचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप

  • कुटुंबीयांनी कठोर कारवाईची मागणी केली

छत्रपती संभाजीनगरमध्ये मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या बायकोने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवऱ्याचे अनैतिक संबंध, कौटुंबिक छळ आणि मानसिक त्रासाला कंटाळून लघाणे महाराजांच्या बायकोने टोकाचे पाऊल उचललं. राहत्या घरी गळफास घेत तिने आयुष्य संपवलं. ही घटना छपत्रपती संभाजीनगरच्या शेपू या गावात घडली. काजल लघाणे असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव होते. या प्रकरणी काजलच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून लघाणे महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव येथील आण्णासाहेब केशवराव जाधव यांची मुलगी काजलचे वर्षभरापूर्वीच २५ मार्च २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगावमधील शेपू गावामध्ये राहणाऱ्या अमोल लघाणेसोबत लग्न झाले होते. अमोल लघाणे मृदंग वाजवणारा असून मृदंगाचार्य म्हणून तो प्रसिद्ध आहे. पारंपारिक पद्धतीने त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता. लग्नाला वर्ष पूर्ण होत नाही तोवरच काजलने नवऱ्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली.

Crime: वर्षभरापूर्वी लग्न, नवऱ्याचे अनैतिक संबंध; मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या बायकोची आत्महत्या, संभाजीनगर हादरले
Pune Crime: दुहेरी हत्याकांडाने आळंदी हादरली, वृद्ध महिलेसह ६ वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या

काजलने १ एप्रिल रोजी सकाळी सव्व सात वाजताच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या नवऱ्याच्या कुटुंबीयांनी तिला तात्काळ घाटी रुग्णालयात नेले पण तोपर्यंत उशिर झाला होता. डॉक्टरांनी काजलला मृत घोषित केले. या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच काजच्या कुटुंबीयांनी संभाजीनगर गाठले त्यांनी अमोल लघाणेच्या त्रासाला कंटाळूनच काजलने आत्महत्या केल्याचा आरोप केला. त्यांनी अमोलविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

Crime: वर्षभरापूर्वी लग्न, नवऱ्याचे अनैतिक संबंध; मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या बायकोची आत्महत्या, संभाजीनगर हादरले
Crime: पुजाऱ्याकडून ५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, डोंबिवली हादरली

काजलच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोलशी लग्न झाल्यानंतर काजलचा संसार व्यवस्थित सुरू होता. या लग्नामुळे दोन्ही कुटुंबीय आनंदी होते. पण लग्नाला काही महिने पूर्ण झाल्यानंतर अमोलचे काजलसोबतचे वागणे बदलले. त्याचे बाहेर दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते याची माहिती काजलला मिळाली होती. या कारणावरून अमोल सतत काजलला त्रास देत होता. तिचा मारहाण करायचा, शिवीगाळ करायचा आणि धमक्या द्यायचा. काजलने तिला होणाऱ्या त्रासाबद्दल आई-वडिलांना सांगितले होते. त्यांनी अमोला समजावले होते पण त्याचा त्रास काही कमी झाला नाही तो काजलला आणखी त्रास देत होता.

Crime: वर्षभरापूर्वी लग्न, नवऱ्याचे अनैतिक संबंध; मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या बायकोची आत्महत्या, संभाजीनगर हादरले
Akola Crime: महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या आरोपी पोलिसाचा थाट, मिळतेय VIP ट्रिटमेंट; राजेश जाधवचा नवा VIDEO समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com