Ambelohal Crime News: मुलीला त्रास का देतो..? म्हणत सासू- सासऱ्याने केलं भयंकर कृत्य; उपचारादरम्यान जावयाचा मृत्यू

या प्रकरणात अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
Chhatrapati Sambhajinagar Crime
Chhatrapati Sambhajinagar CrimeSaamtv
Published On: 

नवनीत तापडिया, प्रतिनिधी...

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती-पत्नीच्या वादातून पहिल्या पत्नीच्या माहेरच्या मंडळींनी केलेल्या मारहाणीत जावयाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. (Crime News In Marathi)

Chhatrapati Sambhajinagar Crime
Raj Thackeray Bhashan: राज ठाकरेंचा एकला चलो रे चा नारा; खेडमधील सभेत बोलताना केली मोठी घोषणा

याबाबत अधिक माहिती अशी की, मुलीला त्रास का देतो? असा जाब विचारत सासरच्या लोकांनी जावयाला दांड्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या जावयाचा मृत्यू झाल्याची घटना अंबेलोहळ (ता. गंगापूर) येथे घडली आहे. अनिल शालीन पिंपळे (वय ३१ रा. अंबेलोहळ गंगापूर) असे मृताचे नाव आहे.

याप्रकरणी संतप्त नातेवाईकांनी आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घाटीत गोंधळ घातला. खुनाचा गुन्हा दाखल होईपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. यानंंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संतप्त नातेवाईकांनी पोलिसांच्या गाडीला घेराव घातला.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Kolhapur AAP Protest News : कोल्हापूरकरांचा नाद करायचा नाय! मनपा शाळांच्या दुरावस्थेबद्दल 'आप'चं लक्षवेधी आंदोलन

या प्रकरणात अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पोलिसांनी चौघा जणांवरती गुन्हा दाखल केला असून त्यातील दोघा जणांवर देखील उपचार सुरू आहेत, तर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.