Raj Thackeray Bhashan: राज ठाकरेंचा एकला चलो रे चा नारा; खेडमधील सभेत बोलताना केली मोठी घोषणा

Raj Thackeray Latest News: आता ज्या निवडणुका आपल्याला लढवायच्या आहेत, त्या स्वबळावर लढवायच्या आहेत. कोणाशीही युतीची भानगड नको असे राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray Bhashan
Raj Thackeray Bhashan saam tv
Published On

Raj Thackeray Sabha Update: खेड नगर परिषदेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. आता ज्या निवडणुका आपल्याला लढवायच्या आहेत, त्या स्वबळावर लढवायच्या आहेत. कोणाशीही युतीची भानगड नको असं मोठं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे.

राज ठाकरे दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. चिपळूण, खेड, दापोली आणि मंडणगड असा राज ठाकरेंचा नियोजित दौरा आहे. पक्ष कार्यालय उद्घाटन आणि कार्यकर्ते पदाधिकारी यांची दौऱ्यादरम्यान बैठक घेणार आहेत.

Raj Thackeray Bhashan
Devendra Fadnavis News : उद्धव ठाकरेंनी खोटी शपथ घेतली, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

खेडमध्ये बोलताना राज ठाकरे म्हणाले, "येणाऱ्या निवडणुकांमद्ये जनता राग व्यक्त करते का हा हे बघायचं आहे. या लोकांनी सध्या राजकारणाचा जो चिखल करून ठेवला आहे, त्यातून जनता काही नवनिर्माण करते का हे मला पहायचं आहे." (Tajya Marathi Batmya)

"समृद्धी महामार्ग जर ४ वर्षांत पूर्ण होऊ शकतो. तर कोकणातील रस्ता 17 वर्षे होऊनही का होऊ शकत नाही. एकच गोष्ट सारखी सारखी घडत असेल तर मतदानाला अर्थ नाही, मला तुमची साथ हवी आहे," असेही आवाहनही यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी केले. तसेच, माझ्या मानातील संताप व्यक्त करण्यासाठी लवकरच मेळावा घेऊन बोलणार असल्याचे देखील राज ठाकरे म्हणाले. (Maharashtra Politics)

Raj Thackeray Bhashan
Mumbai Blast Threat Call: 'सीमा हैदरला पाकिस्तानात न पाठवल्यास २६/११...' मुंबई पोलिसांना धमकीचा फोन

दरम्यान मनसे आणि शिवसेना युतीच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून जोर धरला आहे. यावर बोलताना राज ठाकरे यांनी स्पष्टपणे या चर्चांना नकार दिलेला नाही. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात का हे पाहावं लागणार आहे. तसेच राज ठाकरे त्यांच्या मेळाव्यात नेमकं काय बोलतात याकडेही आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com