Mumbai Blast Threat Call
Mumbai Blast Threat CallSaamtv

Mumbai Blast Threat Call: 'सीमा हैदरला पाकिस्तानात न पाठवल्यास २६/११...' मुंबई पोलिसांना धमकीचा फोन

Seema Haider Pakistan Threat: हा कॉल 12 जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) नियंत्रण कक्षाला आला होता, त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Published on

Mumbai News: पाकिस्तानी सीमा आणि नोएडात राहणारा सचिन यांची प्रेमकहाणीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. भारतासह पाकिस्तानातही सीमा हैदर ही चर्चेत आली आहे. ऑनलाईन पबजी खेळत असताना सीमा आणि सचिन यांची ओळख झाली. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

सचिनसोबत लग्न करण्यासाठी तिने पाकिस्तानसोडून थेट भारत गाठले. मात्र सीमा हैदर भारतात आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची एक खळबळजनक बातमी समोर येत असून मुंबईच्या ट्राफिक पोलीस कंट्रोल रूमला धमकी देणारा एक फोन आला आहे. (Sachin-Seema Love Story)

Mumbai Blast Threat Call
भाजप नेते हैदर आझम यांना झटका; पत्नी रेश्मा खान यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने कारवाईची शक्यता

याबाबत अधिक माहिती अशी की, पाकिस्तानातून (Pakistan) आलेल्या सीमा हैदरबाबत मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आला आहे. ज्यामध्ये सीमा हैदर पाकिस्तानात परत न आल्यास भारत उद्ध्वस्त होईल. अशी धमकी दिली आहे. फोन करणाऱ्याने मुंबईतील वाहतूक नियंत्रण कक्षाला फोन करून 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्यासाठी तयार राहण्याची धमकी दिली.

हा कॉल 12 जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) नियंत्रण कक्षाला आला होता, त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सीमा हैदर पाकिस्तानची असल्याचं उघड झाल्यानंतर तिच्यासह प्रियकर सचिन आणि त्याचे वडील नेत्रपाल यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र तिघांनाही जामीन मंजूर झाला आहे.

Mumbai Blast Threat Call
Bhandara Accident News : उपचार घेऊन घरी परतणाऱ्या वृद्धाचा मृत्‍यू; डंपरने दिली धडक

पबजी खेळताना जुळली लवस्टोरी...

दरम्यान, पबजी (PUBG) खेळताना सचिन आणि सीमा यांची ओळख झाली. याच ओळखीतून त्यांचे प्रेमप्रकरण सुरू झाले. सचिनच्या प्रेमात आकंठ बुडालेली सीमा दुबईमार्गे नेपाळ (Nepal) आणि तिथून नोएडामध्ये पोहोचली. २७ वर्षांच्या सीमाला तिच्या पहिल्या पतीपासून चार मुलं आहेत. तिच्या चारही मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी सचिनने घेतली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com