भाजप नेते हैदर आझम यांना झटका; पत्नी रेश्मा खान यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने कारवाईची शक्यता

हैदर आझम यांची पत्नी रेश्मा खान यांच्यावर बांगलादेशी असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी नोव्हेंबरमध्ये केला होता.
भाजप नेते हैदर आझम यांना झटका; पत्नी रेश्मा खान यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने कारवाईची शक्यता
भाजप नेते हैदर आझम यांना झटका; पत्नी रेश्मा खान यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने कारवाईची शक्यताSaam Tv
Published On

मुंबई: भाजप नेते हैदर आझम यांची पत्नी रेश्मा खान यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे रेश्मा खान यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. खान यांच्यावर बांग्लादेशी (Bangladeshi) नागरिक असताना बोगस कागदपत्रे (Bogus documents) वापरून भारतीय पासपोर्ट मिळवल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Blow to BJP leader Haider Azam; wife Reshma Khan's bail application rejected)

हे देखील पहा -

हैदर आझम (Hyder Azam) यांची पत्नी बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील इस्लामपूर गावाच्या रहिवासी आहे, असा दावा हैदर आझम यांनी आरोपानंतर केला होता. रेश्मा खान (Reshma Khan) यांना यापूर्वी सत्र न्यायालयाने अटकेपासून तात्पुरते संरक्षण दिले होते, कारण त्यांच्या याचिकेवर निर्णय प्रलंबित होता. हैदर आझम यांची पत्नी रेश्मा खान यांच्यावर बांगलादेशी (Bangladeshi) असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी नोव्हेंबरमध्ये केला होता. या प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आदेशावरून माजी सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांनी हे प्रकरण दडपल्याचा दावाही करण्यात आला आहे.

नवाब मलिक यांना हैदर आझम यांचं उत्तर:

महाराष्ट्राचे भाजप नेते हैदर आझम यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देत त्यांच्या दोन्ही पत्नी बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे म्हटले आहे. सरकारने याची चौकशी कोणत्याही एजन्सीकडून करून घ्यावी. ते बांगलादेशचे नागरिक असल्याचे आढळल्यास ते स्वत: त्यांना सीमेवर सोडून येतील असं आझम म्हणाले. ते म्हणाले की, मी 25 वर्षांपासून भाजपशी जोडलेलो आहे. भाजप बांग्लादेशींना देशाबाहेर ठेवण्याच्या आणि त्यांना आश्रय न देण्याच्या बाजूने आहे असं हैदर आझम म्हणाले होते.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com