धानोरकर-वडेट्टीवारांमध्ये पुन्हा संघर्ष; सत्ता गमावल्यानंतरही काँग्रेसमधील वाद मिटेना

chandrapur politics : चंद्रपूरमध्ये महापालिकेमधील काँग्रेसची गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे...गटनेता बदलण्याचा वाद थेट विभागीय आयुक्तांपर्यंत जाऊन पोचला आहे...आमदार वडेट्टीवार आणि खासदार धानोरकरांमध्ये कसं शह-काटशहाचे राजकारण सुरु आहे. पाहूया या रिपोर्टमधून
chandrapur politics
congressSaam tv
Published On

चंद्रपूर महानगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक असतानाही अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसला महापौरपद गमवावं लागलं. आणि भाजपचं फावलं. मात्र सत्ता गमावूनही काँग्रेसमधील गटबाजी शमायला तयार नाही. खासदार प्रतिभा धानोरकर आणि माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातला संघर्ष आणखी टोकाला गेलाय.

chandrapur politics
Maharashtra Politics: मोठी बातमी! काँग्रेसचे २३ नगरसेवक नॉट रिचेबल; राजकीय वर्तुळात खळबळ

काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील 'शह-काटशहाचे' राजकारण थेट नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले आहे. वडेट्टीवार गटाचे विद्यमान गटनेते राजेश अड्डूर यांना पदावरून हटवण्यासाठी धानोरकर गटाने ताकद पणाला लावली आहे. धानोरकर समर्थक असलेल्या 27 नगरसेवकांपैकी 16 नगरसेवकांनी नागपूरचं विभागीय आयुक्तालय गाठलं.

त्यांनी गटनेता बदलण्याबाबत आयुक्तांना पत्र दिलं. धानोरकर समर्थक सुरेंद्र अडबालेंना गटनेता करण्याची मागणी करण्यात आली. दुसरीकडे वडेट्टीवार समर्थक विद्यमान गटनेते राजेश अडूर यांनीही विभागीय आयुक्तांकडे व्हिपचं उल्लंघन करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्याची मागणी केली.

chandrapur politics
Congress Dispute: धानोरकर-वडेट्टीवार संघर्षाने चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; दोन व्हीपने नगरसेवकांमध्ये संभ्रम

राज्यातल्या महापालिकांमधला महायुतीचा विजयरथ चंद्रपूरमध्ये काँग्रेसने रोखला. मात्र सत्ता स्थापनेच्या वेळी आमदार आणि खासदारामधला वाद थेट दिल्ली दरबारी पोचला होता. आता हा वाद पुन्हा उफाळलाय. त्यामुळे आता विभागीय आयुक्त गटनेतेबाबत काय निर्णय देतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मात्र हा वाद काँग्रेससाठी मोठी डोकेदुखी ठरला असून यावर तोडगा काढण्याचं आव्हान काँग्रेस नेतृत्वासमोर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com