एकनाथ शिंदेंच्या खात्यावर CAG ने ओढले ताशेरे; मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरणाचे निर्देश! राजकीय वर्तुळासह महायुतीत खळबळ

CAG Report On Maharashtra 2024-25 Financial Irregularities: कॅगच्या 2024-25 अहवालात महाराष्ट्रातील नगरविकास, आरोग्य आणि महिला व बालविकास विभागातील निधी वापराबाबत गंभीर त्रुटी उघड. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने स्पष्टीकरणाचे आदेश दिल्याने महायुतीत खळबळ.
CAG report exposes major financial lapses in Maharashtra, prompting immediate action from Chief Minister Devendra Fadnavis.
CAG report exposes major financial lapses in Maharashtra, prompting immediate action from Chief Minister Devendra Fadnavis.saam tv
Published On

राज्याच्या आर्थिक कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत भारतीय नियंत्रक आणि महलेखापरीक्षक (CAG) यांच्या अहवालानंतर राज्य सरकारमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आखात्यारीतील नगरविकास आणि आरोग्य खात्यांवर गंभीर ताशेरे ओढण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ अॅक्शन घेत सर्व संबंधित विभागांना स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.

CAG report exposes major financial lapses in Maharashtra, prompting immediate action from Chief Minister Devendra Fadnavis.
पोलीस चेकिंग सुरू असल्याचे बघताच मित्राने डब्यात टाकले ड्रग्ज, विमानतळ कर्मचाऱ्याने मारला डल्ला; कोल्हापूरमध्ये नेमके काय घडले?

CAG अहवालातील धक्कादायक आकडेवारी

नगरविकास विभाग

एकूण तरतूद: 24,610 कोटी

खर्च न झालेला निधी: 11,056 कोटी

तब्बल 45% निधी अखर्चित

कर्ज काढूनही निधी खर्च न केल्याबद्दल कॅगचे ताशेरे

आरोग्य विभाग

मंजूर निधी: ₹19,743 कोटी

खर्चित निधी: ₹3,500 कोटी

18.23% निधी खर्च न झाल्याची नोंद**

आरोग्य व्यवस्थापनातील त्रुटींवर कडक निरीक्षण

महिला व बालविकास विभाग

मंजूर निधी: 29,693 कोटी

प्रत्यक्ष खर्च: 33,267 कोटी

3,541 कोटींचा जादा खर्च

आर्थिक बेशिस्तीचा ठपका

CAG report exposes major financial lapses in Maharashtra, prompting immediate action from Chief Minister Devendra Fadnavis.
Pune Accident: पुण्यात भयंकर अपघात! फादर्स डेच्या दिवशी काळाचा घाला, बाप-लेकीला भरधाव वाहनानं चिरडलं

सरकारचे कडक आदेश

CAG चा 2024-25 आर्थिक अहवालात 10 जुलै 2026 रोजी विधानमंडळात सादर

संबंधित विभागांना 3 महिन्यांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश

स्पष्टीकरण देण्यापूर्वी प्रधान महालेखपाल कार्यालयाची मंजूरी अनिवार्य

लोक लेखा समिती- विधिमंडळ सचिवालाय आणि विधानभवन येथे अहवाल सादर करणे बंधनकारक

20 इंग्रजी आणि 40 मराठी प्रति सादर करण्याचे निर्देश

विलंब झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा

CAG च्या अहवालामुळे राज्यातील आर्थिक नियोजन, निधी वापर आणि प्रशासकीय कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषतः मोठ्या प्रमाणावर निधी खर्च न होणे आणि काही ठिकाणी जास्त खर्च होणे, हे दोन्ही मुद्दे सरकारसाठी चिंतेचे ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com