Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

Buldhana Pregnant Woman Gives Birth on Road: बुलडाण्यामध्ये एका गरोदर महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाली. रुग्णालय जवळ असताना देखील कुणीच तिच्या मदतीला आले नाही.
Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...
Buldhana Pregnant Woman Gives Birth on RoadSaam Tv
Published On
  • बुलडाण्यात रस्त्यावर गर्भवती महिलेची प्रसूती

  • मेहकर ग्रामीण रुग्णालयापासून १०० मीटर अंतरावर घडली घटना

  • महिलेच्या मदतीसाठी कुणीच आले नाही

  • शेवटी खासगी रुग्णालयाच्या नर्सने तिची रस्त्यातच प्रसूती केली

संजय जाधव, बुलडाणा

महाराष्ट्रातील आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रस्त्यावरच एका गरोदर महिलेची प्रसूती झाली. हाकेच्या अंतरावर रुग्णालय असताना देखील या महिलेला मदत करायला कुणी तयार नव्हते. ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने तिला मदत करण्यास नकार दिल्याचा आरोप केला जात आहे. शेवटी खासगी नर्सच्या मदतीने रस्त्यावरच महिलेची प्रसूती करण्यात आली.

मेहकर ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या ५० ते १०० मीटर अंतरावर एका महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना आज मेहकर शहरात घडली. प्रसूतीच्या वेदनांनी महिला तडफडत असताना ग्रामीण रुग्णालयातील स्टाफ नर्सने घटनास्थळी येण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलेची गंभीर अवस्था पाहून योगेश सौभागे यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत मदतीची विनंती केली. मात्र, डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगत स्टाफ नर्सने बाहेर येण्यास नकार दिल्याचे सौभागे यांनी सांगितले.

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...
Buldhana : बुलढाण्यात शेतकरी आंदोलन पेटले! रविकांत तुपकरांच्या आंदोलनादरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी एसटी बस जाळली

अखेर खासगी रुग्णालयातील नर्सच्या मदतीने रस्त्यावरच महिलेची प्रसूती करण्यात आली. त्यानंतर महिला आणि बाळाला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आपत्कालीन परिस्थितीत शासकीय आरोग्य यंत्रणेची भूमिका आणि ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या उपस्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...
Buldhana : दुर्दैवी! पोहण्याचा मोह जीवावर बेतला, पाय घसरून खोल नदीत २ मुलं बुडाली

महिलेला प्रसुती वेदना होत होत्या. वेदना तीव्र झाल्यामुळे ती मदत मागण्यासाठी घराबाहेर आली. त्यावेळी ती ओट्यावर पडली आणि तिच्या पोटातील बाळाचा काही भाग बाहेर आला आणि काही भाग आतमध्ये राहिला. असा परिस्थितीत या महिलेच्या मदतीसाठी रुग्णालयाशी संपर्क करण्यात आला पण कुणीच तिच्या मदतीसाठी आले नाही. शेवटी देवदुतासारखी एका खासगी रुग्णालयाची नर्स तिच्या मदतीला आली आणि तिच्या मदतीने रस्त्यावरत तिची प्रसूती करण्यात आली. तिच्यामुळेच या महिलेचे आणि बाळाचे प्राण वाचले.

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...
Buldhana: प्रसिद्ध डॉक्टरांचा संशयास्पद मृत्यू, शेतात आढळला मृतदेह; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

माजी आमदार संजय रायमुलकर यांनी या प्रकरणाची दखल घेत सामान्य नागरिकांना त्रास झाल्यास ग्रामीण रुग्णालयाच्या कारभाराकडे लक्ष देण्याचा इशारा दिला आहे. संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे. या घटनेची सध्या जिल्हा नव्हे तर राज्यभर चर्चा होत आहे.

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...
Buldhana Crime: विवाहितेवर सामूहिक बलात्कार, विळ्याचा धाक दाखवत नवऱ्यासमोरच भयंकर कृत्य; बुलडाणा हादरले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com