महिलेचा एकाच वेळी 4 बाळांना जन्म, घरातच झाली प्रसुती, डॉक्टरही चक्रावले

Buldhana Tribal Woman Delivers Quadruplets Home Birth: बुलढाण्यात एका महिलेनं घरातच 4 बाळांना जन्म दिलाय.. त्यामुले घरातच महिलेची प्रसुती झाल्यानं डॉक्टरही चक्रावलेत... नेमकं प्रकरण काय आहे? पाहूयात या रिपोर्टमधून....
TRIBAL WOMAN DELIVERS FOUR BABIES AT HOME IN BULDHANA WITHOUT MEDICAL HELP
TRIBAL WOMAN DELIVERS FOUR BABIES AT HOME IN BULDHANA WITHOUT MEDICAL HELPsaam tv
Published On

बुलढाणा जिल्ह्यातल्या एका अतिदुर्गम आदिवासी पाड्यावरून एक अत्यंत दुर्मिळ आणि नवल वाटणारी घटना समोर आलीय... एका आदिवासी पाड्यावर 27 वर्षीय महिलेनं कोणतीही वैद्यकीय मदत किंवा डॉक्टर उपलब्ध नसताना घरीच एकाचवेळी चार बाळांना जन्म दिला. गावातीलच एका अनुभवी महिलेच्या मदतीने ही घरच्या घरी प्रसूती यशस्वीरित्या पार पडलीय.... त्यातही महिलेच्या अपत्यांमध्ये तीन मुलं आणि एका मुलीचा समावेश आहे. यापूर्वीच या महिलेला तीन अपत्य आहेत. त्यामुळे आता या गरीब आदिवासी कुटुंबात एकाच वेळी चार नव्या पाहुण्यांच्या आगमनाने एकूण सात अपत्ये झालेत...

विशेष म्हणजे चार मुलांच्या प्रसूतीनंतर आई आणि चारही नवजात बालकांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे....सर्वांच्या भुवया उंचावणारी ही घटना असली तरी आदिवासी भागातील बिकट वास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलयं...आदिवासी भागात आजही प्रसूतीसारख्या अत्यंत संवेदनशील आणि जीवघेण्या प्रसंगी महिलांना वेळेवर वैद्यकीय सुविधा, अ‍ॅम्ब्युलन्स किंवा रुग्णालयाची मदत मिळत नाही.

एका बाजूला आधुनिक भारताची स्वप्ने पाहिली जात असताना, दुसरीकडे आदिवासी पाड्यांवरील महिलांना आजही मूलभूत आरोग्य सुविधांसाठी असा संघर्ष करावा लागतोय, हा गंभीर प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com