Accident: समृद्धी महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव कारची ट्रकला धडक; नवरा-बायकोचा जागीच मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident: बुलडाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव कारने ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
Accident: समृद्धी महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव कारची ट्रकला धडक; नवरा-बायकोचा जागीच मृत्यू
Samruddhi Mahamarg AccidentSaam Tv
Published On
  • समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला

  • भरधाव कारने ट्रकला पाठीमागून धडक दिली

  • या अपघातामध्ये नवरा-बायकोचा जागीच मृत्यू झाला

  • अपघातामध्ये ३ जण गंभीर जखमी झाले

संजय जाधव, बुलडाणा

बुलडाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव कारने ट्रकला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये कारमधील नवरा-बायकोचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये कार चालकासह ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी जालनाला हलवण्यात आले आहे. या अपघातामध्ये कारचा चुराडा झाला. समृद्धी महामार्गावरील दुसरबीडजवळ ही अपघाताची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर दुसरबीडजवळ आज सकाळी ही अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघे नवरा-बायको होते तर अपघातामध्ये ३ जण जखमी झाले आहेत. जखमींवरती जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर समृद्धी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी दोन्ही वाहनं बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.

Accident: समृद्धी महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव कारची ट्रकला धडक; नवरा-बायकोचा जागीच मृत्यू
Accident News : नवी मुंबईत हिट अँड रनचा थरार! अवजड वाहनाच्या धडकेत बाईकरचा जागीच मृत्यू; चालक फरार

डॉक्टर सय्यद आसिफ सय्यद उमर हे आपल्या पत्नी गुलसीतान बी आणि कुटुंबासह नागपूरवरून संभाजीनगरच्या दिशेने जात असताना ही अपघाताची घटना घडली. त्यांच्या भरधाव कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. या अपघातामध्ये डॉक्टर सय्यद आसिफ आणि त्यांची पत्नी गुलसितान बी यांचा जागीच मृत्यू झाला.

Accident: समृद्धी महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव कारची ट्रकला धडक; नवरा-बायकोचा जागीच मृत्यू
Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

या अपघातामध्ये डॉक्टर सय्यद यांच्या कारचा चालक आणि दोन जण जखमी झाले आहेत. या तिन्ही जखमींवरती सध्या जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टर सय्यद यांचे कुटुंब नागपूरवरून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात होते. या अपघातामध्ये कारचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातामुळे सय्यद उमर यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

Accident: समृद्धी महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव कारची ट्रकला धडक; नवरा-बायकोचा जागीच मृत्यू
Accident News : बर्थडेच्या दिवशीच काळाचा घाला; भरधाव कार अपघातात फुटबॉलपटू आणि तरुणीचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com