Accident News : नवी मुंबईत हिट अँड रनचा थरार! अवजड वाहनाच्या धडकेत बाईकरचा जागीच मृत्यू; चालक फरार

Navi Mumbai Acicdent News : नवी मुंबईतील रोडपल्ली सर्कलजवळ भीषण हिट-अँड-रन दुर्घटनेत ३१ वर्षीय कृष्णमोहन झा यांचा मृत्यू झाला. वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस तपास करत आहेत.
NAVI MUMBAI HIT AND RUN ACCIDENT: 31-YEAR-OLD KRISHNAMOHAN JHA KILLED NEAR ROADPALI CIRCLE
NAVI MUMBAI HIT AND RUN ACCIDENT: 31-YEAR-OLD KRISHNAMOHAN JHA KILLED NEAR ROADPALI CIRCLESaam tv
Published On
Summary
  • नवी मुंबईत हिट-अँड-रनचा थरार

  • रोडपल्ली सर्कलजवळ अपघातात ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

  • अज्ञात अवजड वाहनाने चिरडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

  • अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार

Navi Mumbai Panvel Mumbra Highway Hit And Run Accident नवी मुंबईतून मोठी दुर्घटना घडली आहे. पनवेल-मुंब्रा महामार्गावरील रोडपल्ली सर्कलजवळ शुक्रवारी दुपारी भीषण अपघात घडला. हिट-अँड-रनच्या थरारक दुर्घटनेत ३१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कृष्णमोहन झा असे मृत व्यक्तीचे नाव असून, अज्ञात अवजड वाहनाने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारच्या सुमारास कोपरखैराणे येथील रविराज दहिफळे हे रोडपल्ली सर्कल परिसरातून वाहनाने जात असताना त्यांना रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत एक व्यक्ती पडलेली दिसली. त्यांनी तातडीने कळंबोली पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

NAVI MUMBAI HIT AND RUN ACCIDENT: 31-YEAR-OLD KRISHNAMOHAN JHA KILLED NEAR ROADPALI CIRCLE
Rain Alert : मुंबईत अखेर मान्सूनचे दमदार आगमन, पुढील काही तास महत्त्वाचे; वाचा हवामानाचा अंदाज

पोलिसांनी जखमी व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी त्याच्या खिशाची तपासणी केली असता ड्रायव्हिंग लायसन आणि ओळखपत्र सापडले. त्यावरून मृत व्यक्तीची ओळख कृष्णमोहन झा अशी पटली. त्यानंतर पोलिसांनी खासगी रुग्णवाहिकेच्या मदतीने झा यांना तातडीने पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातातील गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

NAVI MUMBAI HIT AND RUN ACCIDENT: 31-YEAR-OLD KRISHNAMOHAN JHA KILLED NEAR ROADPALI CIRCLE
Vidhan Parishad Election 2026 : राज्यात विधान परिषदेच्या ११ जागांचा निकाल जाहीर होणार, कोण मारणार बाजी?

या प्रकरणी कळंबोली पोलिसांनी (Kalamboli Police) अज्ञात अवजड वाहनाच्या अज्ञात चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून वाहनाचा आणि चालकाचा शोध सुरू केला आहे. (Panvel Bike Accident News )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com