Vidhan Parishad Election 2026 : राज्यात विधान परिषदेच्या ११ जागांचा निकाल जाहीर होणार, कोण मारणार बाजी?

Vidhan Parishad Election Result 2026 : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या ११ जागांसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होणार आहे. राज्यातील राजकीय समीकरणांचे पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.
MAHARASHTRA MLC ELECTION RESULTS 2026: COUNTING BEGINS FOR 11 SEATS, POLITICAL EQUATIONS TO BECOME CLEAR TODAY
MAHARASHTRA MLC ELECTION RESULTS 2026: COUNTING BEGINS FOR 11 SEATS, POLITICAL EQUATIONS TO BECOME CLEAR TODAYSaam Tv
Published On
Summary
  • महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या ११ जागांचा आज निकाल

  • राज्यातील १७ पैकी ६ जागांवर उमेदवार बिनविरोध

  • आजच्या निकालांमुळे राजकीय समीकरणांचे पुढील चित्र स्पष्ट होणार

Maharashtra Vidhan Parishad Election Result Today गेल्या काही आठवड्यांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांच्या मतमोजणीला आज सुरुवात होणार आहे. राज्यातील एकूण १७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली असून त्यापैकी ६ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे उर्वरित ११ जागांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष या निकालांकडे लागले आहे.

राज्यात १८ जून रोजी विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. या निवडणुकीत महायुती संख्याबळाच्या जोरावर यशाच्या टप्प्यावर असल्याचे चित्र असले तरी उमेदवारी वाटप आणि स्थानिक पातळीवरील नाराजीमुळे काही ठिकाणी बंडखोरी निर्माण झाली होती. विरोधकांपेक्षाही पक्षांतर्गत असंतोष महायुतीसाठी मोठी डोकेदुखी ठरल्याची चर्चा होती. मात्र निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात ही बंडखोरी नियंत्रणात आणण्यात महायुतीला यश आल्याचे मानले जात आहे. तरीही मतदारांचा अंतिम कौल कोणाच्या बाजूने जाणार, याबाबत उत्सुकता कायम आहे.

MAHARASHTRA MLC ELECTION RESULTS 2026: COUNTING BEGINS FOR 11 SEATS, POLITICAL EQUATIONS TO BECOME CLEAR TODAY
Rain Alert : मुंबईत अखेर मान्सूनचे दमदार आगमन, पुढील काही तास महत्त्वाचे; वाचा हवामानाचा अंदाज

ठाणे, यवतमाळ, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर आणि अहिल्यानगर या सहा मतदारसंघांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ठाण्यातून रवींद्र फाटक, यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून अनिकेत तटकरे, पुण्यातून विक्रम काकडे, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूरमधून अरुण लखाणी आणि अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

आज सोलापूर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली तसेच छत्रपती संभाजीनगर-जालना या ११ मतदारसंघांचे निकाल जाहीर होणार आहेत. मतदानाची टक्केवारी पाहिल्यास अनेक मतदारसंघांमध्ये अटीतटीचा सामना होण्याची शक्यता आहे. नाशिक आणि भंडारा-गोंदिया येथे १०० टक्के मतदान झाले. सांगली-सातारा येथे ९९.८९ टक्के, परभणी-हिंगोली येथे ९९.७८ टक्के, तर सोलापूरमध्ये ९९.६८ टक्के मतदानाची नोंद झाली. त्यामुळे या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला असून आजच्या निकालातून राज्यातील राजकीय समीकरणांचे पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com