पराग ढोबळे, साम टीव्ही
विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. भाजपचे माजी आमदार गिरीश व्यास यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भाजपचे बंडखोर उमेदवार आणि माजी आमदार प्रा. अनिल सोले यांना त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. भाजपने या मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षातील नाराजी उघड झाली आहे. याच पार्श्वभूमीवर गिरीश व्यास यांनी अनिल सोले यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली आहे. पक्षाकडून कारवाई होण्यापूर्वी आपण स्वतः राजीनामा दिल्याचे व्यास यांनी सांगितले आहे.
अनिल सोले यांच्या प्रचारासाठी गिरीश व्यास यांनी आपले कार्यालय उपलब्ध करून देण्याचाअ निर्णय घेतला आहे. नागपुरातील महाल परिसरातील व्यास यांच्या कार्यालयात सोले यांचे मुख्य प्रचार कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपमधील नाराजीचा मुद्दा चर्चेत आला आहे.
गिरीश व्यास भारतीय जनसंघांचे माजी संस्थापक अध्यक्ष पंडित बच्छराज व्यास यांचे पुत्र आहेत. तसेच ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यांनी 2016 ते 2022 या कालावधीत विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.
जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत भाजपमधील नाराजी व्यक्त केली जात आहे. सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिल्यानंतर गिरीश व्यास यांनी घेतलेली पक्षासाठी भूमिका महत्वाची मानली जात आहे. आता या घडामोडींचा नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काय परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.