Maharashtra Politics: ठाकरेसेनेतून शिंदे गटात गेले, आता जाहीर नाराजी बोलून दाखवली; शिंदे संतापून म्हणाले, विचार करावा लागेल!

Eknath Shinde On Gajanan Kiritikar: शिवेसना शिंदेसेनेचे नेते गजानन कीर्तिकर हे नाराज असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. त्यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना नाराजी बोलून दाखवली. आता एकनाथ शिंदे त्यांच्यावर संतापलेत.
Maharashtra Politics: ठाकरेसेनेतून शिंदे गटात गेले, आता जाहीर नाराजी बोलून दाखवली; शिंदे संतापून म्हणाले, विचार करावा लागेल!
Eknath Shinde Saam Tv
Published On: 
  • गजानन कीर्तिकर शिंदेसेनेत नाराज असल्याच्या चर्चा

  • गजानन कीर्तिकरांच्या नाराजीवर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर

  • एकनाथ शिंदे गजानन कीर्तिकरांवर संतापले

  • तुमचा विचार करावा लागेल असे शिंदे कीर्तिकरांना म्हणाले

सूरज मसूरकर, मुंबई

शिंदेसेनेचा बडा नेता नाराज असून ते पुन्हा ठाकरे गटात घरवापसी करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चा सुरू असतानाच शिंदेसेनेचे नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिंदेसेनेत नाराज असल्याचे जाहीर सांगितले. पक्षाच्या प्रमुखांशी संपर्क होत नसल्याचे देखील त्यांनी बोलून दाखवले. गजानन कीर्तिकर यांच्या नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यावर चांगलेच संतापले आहेत. कीर्तिकरांनी जाहीर नाराजी बोलून दाखवली तर शिंदेंनी त्यांना थेट विचार करावा लागेल असे सांगितले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गजानन कीर्तिकरांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले असल्याचे सांगितले जात आहे. पक्षात नाराज असल्याच्या आणि ते पुन्हा ठाकरे गटात परत जाण्याच्या बातम्या आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी कीर्तिकारांचे कान टोचले. असं असेल तर आम्हाला विचार करावा लागेल, असं एकनाथ शिंदे कीर्तिकरांना बोलले. तसंच, आज संध्याकाळी गजानन कीर्तिकरांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला देखील यायचं की नाही हे आम्हाला ठरवावे लागेल, असे देखील शिंदे त्यांना म्हणाले. त्याचसोबत घडलेल्या घटनेवर खुलासा करा असे आदेश एकनाथ शिंदे यांनी कीर्तिकरांना दिले आहे. यावर गजानन कीर्तिकर काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Maharashtra Politics: ठाकरेसेनेतून शिंदे गटात गेले, आता जाहीर नाराजी बोलून दाखवली; शिंदे संतापून म्हणाले, विचार करावा लागेल!
Maharashtra Politics: मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई, राजकीय वर्तुळात खळबळ

गजानन कीर्तिकर नाराज असल्याच्या चर्चा सुरू असताना त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, 'मी नाराज जरूर आहे मात्र मी दल बदलू नाही. मी घरवापसी करणार नाही. ठाकरेंच्या शिवसेनेत परतणार या बातम्या चुकीच्या आहेत. मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पाठीमागे उभा आहे. पण मी नाराज आहे. कारण आमचे पक्षप्रमुख आहेत त्यांच्याशी संपर्क होत नाही. त्यांची भेट होत नसल्याने जनहिताची काही कामं करता येत नाहीत. शिवसेनेचा नेता असल्यामुळे अन्यायग्रस्त आमच्याकडे येतात. सरकारकडून न्याय मिळावा म्हणून ही लोकं येतात. त्यांच्यासाठी आम्हाला संपर्काची गरज असते. पक्षप्रमुखांच्या भेटीची गरज असते पण भेट होत नाही म्हणून मी नाराज आहे.'

Maharashtra Politics: ठाकरेसेनेतून शिंदे गटात गेले, आता जाहीर नाराजी बोलून दाखवली; शिंदे संतापून म्हणाले, विचार करावा लागेल!
Maharashtra Politics: मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी, राजकीय वर्तुळात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com