Mumbai-Pune Train: पुणे-मुंबईकरांना मोठा दिलासा, १० दिवसांनतर रेल्वे रूळावर; कोणकोणत्या ट्रेन सुरू झाल्या?

Mumbai-Pune Train Services Resume: मुंबई- पुणे रेल्वेसेवा तब्बल १० दिवसांनंतर पुन्हा पूर्वपदावर आली आहे. रेल्वेसेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Mumbai-Pune Train: पुणे-मुंबईकरांना मोठा दिलासा, १० दिवसांनतर रेल्वे रूळावर; कोणकोणत्या ट्रेन सुरू झाल्या?
Mumbai-Pune TrainSaam TV
Published On
  • मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

  • मुंबई-पुणे रेल्वेसेवा पुन्हा सुरू झाली

  • लोणावळा-कर्जत घाटात दरड कोसळल्यामुळे रेल्वेसेवा होती ठप्प

  • १० दिवसांनंतर रेल्वेसेवा पूर्ववत झाली

  • डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पुन्हा सुरू

सचिन जाधव, पुणे

पुणे- मुंबई आणि मुंबई-पुणे असा रोज रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई-पुणे आणि पुणे- मुंबई रेल्वेसेवा तब्बल १० दिवसांनंतर पुन्हा सुरू झाली आहे. लोणावळा- कर्जतदरम्यान दरड कोसळल्यामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली होती. दरड हटवण्याचे काम आणि रूळ दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील रेल्वेसेवा सुरळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. प्रवास आता सुरळीत होणार असल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पुणे-मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 'डेक्कन क्वीन' आणि 'इंटरसिटी' ट्रेन आजपासून पुन्हा धावणार आहे. लोणावळा-कर्जत घाटातील डाउन रेल्वे लाइन तब्बल १० दिवसांनंतर पूर्ववत झाली आहे. ६ जुलैच्या दरड दुर्घटनेनंतर रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. १,२०० हून अधिक रेल्वे कर्मचारी आणि अभियंत्यांनी अहोरात्र काम करून मार्ग पूर्ववत केला. डाउन लाइन सुरू झाल्यानंतर मालगाड्यांची यशस्वी चाचणी करण्यात आली. त्यानंतर प्रवासी रेल्वे सेवा सुरू करण्यात आली.

Mumbai-Pune Train: पुणे-मुंबईकरांना मोठा दिलासा, १० दिवसांनतर रेल्वे रूळावर; कोणकोणत्या ट्रेन सुरू झाल्या?
Mumbai Pune train : लोणावळ्याजवळ दरड कोसळली, ३१ एक्सप्रेसच्या वेळापत्रकात मोठा बदल, १७ ट्रेन रद्द, वाचा संपूर्ण यादी

पुणे-सीएसएमटी 'डेक्कन क्वीन' आणि 'इंटरसिटी एक्सप्रेस'ची सेवा पुन्हा पूर्ववत झाली आहे. तिसरी म्हणजेच अप लाइन सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मलबा हटविण्यासाठी बोल्डर स्पेशल ट्रेन, युनिमॅट मशीन आणि जेसीबीचा वापर करण्यात आला. प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वे हेल्पलाइन किंवा NTES ॲपवर गाड्यांची माहिती तपासण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन केले आहे. या रेल्वेने प्रवास करणारे सर्वाधिक प्रवासी हे कर्मचारी वर्ग आहे. मुंबई किंवा पुण्यात ते नोकरीनिमित्त दररोज अप-डाऊन करतात. पण १० दिवसापासून रेल्वेसेवा ठप्प झाल्यामुळे त्यांना मोठा फटका बसला होता.

Mumbai-Pune Train: पुणे-मुंबईकरांना मोठा दिलासा, १० दिवसांनतर रेल्वे रूळावर; कोणकोणत्या ट्रेन सुरू झाल्या?
Mumbai Pune Trains: पुणे-मुंबई रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! सलग ७ दिवस 'या' ३० गाड्या धावणार नाहीत; रेल्वेने सांगितलं मोठं कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com