

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
दहावी- बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून सुरू होणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे वेळापत्रक जाहीर
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १६ जूनपासून या पुरवणी परीक्षांना सुरूवात होणार आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी आताच वेळापत्रक चेक करून अभ्यासाला सुरूवात करावी.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुन-जुलैमध्ये होणाऱ्या दहावी-बारावीची पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १६ जूनपासून पुरवणी परीक्षा सुरू होणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा पुरवणी परीक्षा लवकर सुरू करण्यात येत आहे.
राज्य मंडळाने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळामार्फत आयोजित दहावी-बारावीच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
बारावीची लेखी परीक्षा १६ जून ते ८ जुलै दरम्यान, तर दहावीची परीक्षा १६ ते ३० जून दरम्यान होणार आहे. तर बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा १६ जून ते ८ जुलै दरम्यान होईल. यात माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेचाही समावेश आहे.
तर दहावीची परीक्षा १६ ते ३० जून दरम्यान होणार आहे. दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. विद्यार्थ्यांनी हे वेळापत्रक पाहून अभ्यासाची तयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.