

कंदिलाच्या उजेडात अभ्यास करून मिळवले यश
वैष्णवी बाडगुडेची प्रेरणादायी दहावी यशोगाथा
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत 94.20 टक्के गुण
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ८ मे रोजी जाहीर झाला. दहावीच्या बोर्ड परीक्षेत राज्याचा निकाल ९२.०९ टक्के लागला. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या निकालात मुलींनीच वर्चस्व गाजवले. यातील काहींनी खडतर परिस्थितीशी झुंज देत दहावीच्या बोर्ड परीक्षेत उज्ज्वल कामगिरी केली. यातील एक अशीच विद्यार्थिनी आहे, जिने आपल्या हलाकीच्या परिस्थितीचा बाऊ न करता परीक्षेत ९४.२० टक्के गुण मिळवत आपल्या आई-वडिलांचे नाव उज्ज्वल केलं.
या विद्यार्थिनीचे नाव आहे, वैष्णवी मोहन बाडगुडे. सोलापूर बार्शी तालुक्यातील शेळगाव (आर) येथील वैष्णवी हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत ९४.२० टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. वैष्णवीची शिकण्याची जिद्दीने अनेकांना प्रेरणा दिली आहे. वैष्णवी दररोज दोन किलोमीटर पर्यंत पायपीट करत शाळेत जात असायची. विशेष म्हणजे वैष्णवीच्या घरी सुखसोयी नाहीत, रात्री कंदीलच्या उजेडात तिने अभ्यास करत परीक्षेत चांगले मार्क मिळवले.
शेळगाव (आर) हे गाव सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे. यामुळे येथे भौगोलिक अडचणी पाचीला पुंजलेल्या. वैष्णवीचे वडील मोहन बाडगुडे यांची शेती धाराशिव जिल्ह्यातील वाणेवाडी (ता. तुळजापूर) शिवारात आहे. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ताही नसल्याने पावसाळ्यात तिला चिखल तुडवत आणि उन्हाळ्यात रणरणत्या उन्हात वैष्णवीला दररोज सुमारे दोन किलोमीटर अंतर पायी जावे लागत होते.
वैष्णवी आणि तिचे कुटुंबीय शेतात राहतात. त्यामुळे शेतात वीज आणि मूलभूत सुविधांचीही मोठी कमतरता होती. मात्र, परिस्थितीसमोर न झुकता वैष्णवीने घरकाम आणि शेतीचे काम करतान,आई-वडिलांना मदत करत अभ्यास चालू ठेवला. अभ्यासाचे योग्य नियोजन केले. दिवसभर काम केल्यानंतर रात्री गाव शांत झाल्यावर ती सौर कंदील आणि बॅटरीच्या मंद उजेडात तासन्तास अभ्यास करायची, तिच्या जिद्दीपुढे अंधारही फिका पडला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.