SSC HSC Student: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Board Big Decision for SSC HSC Student: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता खाजगी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना फॉर्म १७ भरायचा आहे.
SSC HSC Student
SSC HSC StudentSaam Tv
Published On
Summary

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

खाजगी पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फॉर्म जारी

फॉर्म १७ भरुन जूनमध्ये परीक्षा देता येणार

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.आता जून-जुलैमध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर १७ भरावा लागणार आहे. हा फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थ्यांना खाजगीरित्या परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना खाजगीरित्या परीक्षा द्यायची आहे त्यांनी फॉर्म भरायचे आहे. बोर्डाने याबाबत अपडेट दिली आहे.

SSC HSC Student
SSC Exam: मुख्याध्यापक पद खुपत होतं, शाळेतूनच रचला डाव; भूगोलाच्या पेपर चोरीची A to Z स्टोरी आली समोर

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी (Impoartant News for SSC HSC Students)

दहावी-बारावीच्या (SSC-HSC Student)जून-जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार आहे. नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या सध्याच्या पत्त्यातील जिल्हा, निवडलेले माध्यम, शाखेनुसार शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांची यादी दिसेल त्यातून एका शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाची निवड करावी लागेल.

नोंदणी शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे. त्याबाबतची पावती विद्यार्थ्याच्या त्याच्या लॉगिनमध्ये उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना नावनोंदणीसाठी mahahsscboard.in या संकेस्थळाचा वापर करावा लागणार आहे.

SSC HSC Student
SSC-HSC Result: दहावी-बारावीचा निकाल कुठे अन् कसा पाहावा? स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ही नोंदणीप्रक्रिया केली जाणार आहे.याबाबत राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी परिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. शाळाबाह्य विद्यार्थी जे नोंदणी करु शकले नाही, अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी ही संधी देण्यात आली होती. जून-जुलै २०२५ च्या परीक्षांसाठी खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी करु शकतात. या विद्यार्थ्यांच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये राज्य मंडळाच्या अटी-शर्तींनुसार नावनोंदणी करण्यासाठी उपलब्ध आहेत.

SSC HSC Student
HSC, SSC Result: बारावी बोर्डाचा निकाल कधी जाहीर होणार? mahresult.nic.in वर डाउनलोड करा मार्कशीट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com