कलयुग! बीडमध्ये नात्याला काळिमा; मुलगा सावत्र आईला घेऊन पळाला

beed Shocking News : आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार बीड जिल्ह्यात घडला आहे. मुलगा आणि सावत्र आई हे प्रेमीयुगुल पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
beed latest news
beed news Saam tv
Published On
Summary

बीडमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली

बीडमधील मुलगा सावत्र आईसोबत पळाल्याची घटना उघडकीस

बीडमधील प्रकाराने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ

योगेश काशिद, साम टीव्ही

बीडच्या केज तालुक्यातील एका गावातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बीडच्या केजमधील एका गावात एका जोडप्याला दोन मुले आणि दोन मुली आहेत. दोन्ही मुलींचे लग्न झाली आहेत. कौटुंबीक वादामुळे या व्यक्तीची पत्नी मागील पंधरा वर्षांपासून विभक्त राहतेय. दोन्ही मुले वडिलांकडे राहत असून शेती करतात. कौटुंबिक अडचणीमुळे या व्यक्तीने चार वर्षांपूर्वी एका महिलेसोबत दुसरे लग्न केलं. केजमधील पीडित व्यक्ती पहिल्या पत्नीपासून झालेली दोन मुले आणि त्याची दुसरी पत्नी असे घरात एकत्र राहत होते. याच केजमध्ये पीडित व्यक्तीचा मुलगा सावत्र आईसोबत पळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

केजमधील व्यक्ती १२ एप्रिल रोजी मुंबई येथील रत्नेश्वरी देवीच्या दर्शनासाठी यात्रेला गेला होता. त्यावेळी सावत्र आई आणि मुलगा एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर चाळीस वर्षांची महिला १५ एप्रिल रोजी नवऱ्याला सोडून त्याच्या मुलासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नात्याला काळिमा फासणाऱ्या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब बांगर हे करीत आहेत.

beed latest news
लव्ह, सेक्स आणि धोका! पालघरमध्ये लव्ह जिहादचा प्रकार, बीडच्या तरूणाने महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले

महिलेच्या नवऱ्याने पोलिसांत जाऊन दोघांच्या विरोधात तक्रार दिली आहे. एका बाजूला पळून गेलेली बायको, तर दुसऱ्या बाजूला पळवून नेणारा मुलगा. पळून जाताना पीडित व्यक्तीच्या जावयाची दुचाकी देखील नेली आहे. त्यामुळे केजमधील व्यक्ती तिहेरी कचाट्यात अडकला आहे.

प्रेमीयुगुल दुसऱ्या राज्याचे

सावत्र आई आणि मुलगा यांनी पळून जाण्यासाठी वापरलेली मोटार सायकल ही त्या व्यक्तीच्या सावत्र जावयाच्या नावावर नोंद आहे. दोघांनी पळून जाताना वाहतुकीच्या नियमांचा भंग देखील केला. त्यामुळे १६ एप्रिल रोजी सकाळी तेलंगणा राज्यातील वाहतूक पोलिसांचा इंदिरा नगर, गच्चीबोली येथे १ हजार २३५ रुपयांचा दंड केलेला असल्याचा मेसेज मोबाईलवर आला.

beed latest news
Chandrapur : नाशिकनंतर चंद्रपूरमध्ये अघोरी पूजेच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण; मोठ्या रॅकेटचा पर्दाफार्श

नात्याचा जांगडगुत्ता

बायकोला पळवून नेणारा मुलगा तर पळून जाण्यासाठी वापरलेली मोटार सायकल ही जावयाची होती. तर या प्रकरणानंतर पीडित व्यक्तीने आता बायकोला सून म्हणावे की, बायको,असा नात्याचा जांगडगुत्ता झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com