लव्ह, सेक्स आणि धोका! पालघरमध्ये लव्ह जिहादचा प्रकार, बीडच्या तरूणाने महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले

Love Jihad In Palghar: पालघरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेला बनावट ओळख सांगून तिला फसवलं. त्यानंतर तिच्याकडून पैसे उकाळल्याचा प्रकार समोर आला आहे.
Love Jihad In Palghar:
Accused used fake identity and social media to trap and exploit woman in Palghar.saam tv
Published On
Summary
  • पालघरमध्ये बनावट ओळख वापरून फसवणूक

  • प्रेम आणि लग्नाच्या नावाखाली आर्थिक शोषण

  • सोशल मीडियावरून संपर्क साधून गुन्हा

रुपेश पाटील, साम प्रतिनिधी

नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीतील ‘कॉर्पोरेट जिहाद‘चे प्रकरण ताजे असतानाच पालघरमध्ये लव जिहादचा (Love Jihad) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हिंदू धर्माच्या नावाचे बनावट ओळखपत्र बनवून २९ वर्षीय मुलीला फसवल्याचा प्रकार पालघरमध्ये घडला आहे. सोशल मीडियाद्वारे संबंधित तरुणाने तरुणीला फसवले आहे. बनावट हिंदू नावाने इंस्टाग्राम अकाउंट तयार करून आरोपीने २९ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्याकडून सुमारे अडीच लाख रुपये उकळले.

Love Jihad In Palghar:
Beed Crime News: बीडमध्ये शेतकऱ्याची निर्घृण हत्या; बाप-लेकासह नातवावर गुन्हा दाखल

बीड जिल्ह्यातील राजू सिकंदर शेख याने “अजय म्हस्के” या नावाने बनावट ओळख तयार करत पीडितेशी संबंध प्रस्थापित केले. मंदिरात नेऊन खोटे लग्न केल्याचा दिखावा करत सहा महिन्यांत आर्थिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप संबंधित तरुणावर आहे. विशेष म्हणजे आरोपीच्या पत्नीने अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत २ लाख रुपयांची खंडणी मागितली.

घाबरलेल्या पीडितेने तक्रार दिल्यानंतर केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पालघर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पुण्यातून अटक केली असून न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात फसवणूक, ब्लॅकमेल आणि खंडणीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

Love Jihad In Palghar:
Nanded Crime: शिवसेना कार्यकर्ता सोनू कल्याणकरच्या खून प्रकरणात मोठा ट्विस्ट; प्रेयसीच्या आईनेच दिली हत्येची सुपारी

याप्रकरणी पालघरमधील बजरंग दलचे मुकेश दुबे म्हणाले, ही पीडिता चौथी मुलगी होती. याआधी त्याने ३ मुलींना आपल्या जाळ्यात अडकवले आहे. तरुणांनी अशा सोशल मीडियावरील लोकांपासून सावध राहिले पाहिजे. या लोकांचा हेतू काय असतो माहिती नसतो, ते आधी मैत्री करतात पण त्यांच्या हेतू वेगळा असतो. संबंधित तरुणाने नाव बदलून पीडित मुलीशी मैत्री केली. त्याने त्याचे नाव अजय म्हस्के सांगितलं. या नावाने तो इस्टाग्रामवर अकाउंट चालवत होता. अजय म्हणून घेणारा हा मुलगा मुस्लीम असल्याचा उलगडा पाच महिन्यानंतर झाला.

या मुलाने पीडितेकडून अडीच लाख रुपये उकाळले. त्यानंतर या तरुणाची बायकोही पीडित तरुणीला ब्लॅकमेल करू लागली. मुलीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून २ लाख रुपयांची मागणी केली. या पीडितेने आज हिम्मत करत तक्रार दाखल केली आहे. आम्ही तिला धीर दिला, त्यानंतर तिची तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी गजाआड झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com