Nanded Crime: शिवसेना कार्यकर्ता सोनू कल्याणकरच्या खून प्रकरणात मोठा ट्विस्ट; प्रेयसीच्या आईनेच दिली हत्येची सुपारी

Nanded Sonu Kalyankar Killing Case: सोनू कल्याणकर खून प्रकरणात काय ट्विस्ट आला आहे. प्रेयसीची आईच मुख्य सूत्रधार असल्याचं तपासात समोर आले आहे. इंदुबाई मंगनाळे या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Nanded Sonu Kalyankar Killing Case:
Police escort accused in Sonu Kalyankar murder case after shocking revelations about contract killing.saam tv
Published On
Summary
  • सोनू कल्याणकर खून प्रकरणात मोठा ट्विस्ट

  • तरुणीची आई मुख्य सूत्रधार असल्याचा खुलासा

  • सुपारी देऊन खून घडवून आणल्याचा आरोप

संजय सुर्यवंशी, साम प्रतिनिधी

शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता सोनू कल्याणकर याच्या खून प्रकरणाच्या तपासात नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहे. प्रेम संबंधातून झालेल्या या खूना मागे तरुणीची आईचं मुख्य सूत्रधार असून मारेकऱ्यांना लाखो रुपये दिल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी इंदुबाई मंगनाळे या महिलेला ताब्यात घेतले आहे.

Nanded Sonu Kalyankar Killing Case:
दोघांच्या घट्ट मैत्रीचा भयानक शेवट, मित्राच्या आईला मेसेज केला; मोबाइल बघितल्यानंतर सटकलीच, झोपेतच दोस्ताला संपवलं

खूनाच्या कटात तरुणीची आईचं मुख्यसूत्रधार निघाल्याने खळबळ उडाली आहे. सदर महिला आरोपीचा मुलगा हा कुख्यात दहशतवादी रिंदा गँगचा सदस्य असून तो जेलमध्ये आहे.तर पतीला देखील पोलिसांनी खून प्रकरणात अटक केली आहे. सोमवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास मॉर्निंगवॉकला गेलेल्या सोनू कल्याणकर या ३५ वर्षीय तरुणाची चार हल्लेखोरानी धारदार शस्त्राने शरीरावर वार करून निर्घृणपणे खून केला होता.

श्रीनगर भागात मुख्य रस्त्यावर ही घटना घडली. सोनू कल्याणकर हा शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता होता. दहा ते बारा वर्षा पूर्वी त्याचे रिदा गँगचा सदस्य असलेल्या गोलू मंगळनाळे याच्या बहिणीसोबत प्रेम संबंध होते. ही बाब माहिती झाल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी विरोध केला. कुटुंबीयांनी मुलीचा विवाह दुसऱ्या ठिकाणी ठरविले होते, पण मयताने सोयरीक मोडली.

याचा राग मनात धरून 2021 साली मुलीचा भाऊ गोलू मंगनाळे याने सोनू कल्याणकर याच्यावर गोळीबार केला होता. त्यात तो थोडक्यात बचावला. हे प्रकरण मिटलं अस वाटतं होतं, मात्र 6 एप्रिल रोजी चार हल्लेखोरानी सोनू कल्याणकर याचा निर्घृणपणे खून केला. पोलिसांनी गटनेच्या काही तासातचं रोहित लोट, पियुष शिंदे, अंकुश गंधनवाड, मधू जोगदंड याला ताब्यात घेतले. सुरुवातीला जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे बोलल्या जातं होतं, त्यानंतर या प्रकरणाला प्रेम संबंधाची किनार लागली.

Nanded Sonu Kalyankar Killing Case:
Nanded Crime: सोनू कल्याणकरच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट; हत्येमागील धक्कादायक कारण आलं समोर

भाग्यनगर पोलिसांनी तरुणीचा भाऊ गोलू मंगनाळे, वडील चंद्रविजय मंगळनाळे यांच्यासह इतर चार जणा विरोधात गुन्हा दाखल केला. तपासा दरम्यान धक्कादायक बाब समोर आली. तरुणीच्या भावाने नाही तर त्याची आई इंदूबाई मंगनाळे हिने हल्लेखोराना सुपारी दिल्याचे समोर आल आहे. जो पर्यंत तो मरणार नाही, तो पर्यंत मला झोप लागणार नाही अस महिलेने मुलाचा मित्र असलेला आरोपी पियुष शिंदे याच्याकडे म्हणत होती, त्यानंतर महिलेने बँकेतून लाखो रुपये काढून हल्लेखोराना दिल्याची कबुली महिलेने पोलिसांनी दिली. खूनाच्या प्रकरणात तरुणीची आईच मुख्य सूत्रधार निघाल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com