Nanded Crime: सोनू कल्याणकरच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट; हत्येमागील धक्कादायक कारण आलं समोर

Nanded Crime : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सोनू कल्याणकरवर चार जणांनी हल्ला करून त्याची हत्या केली. सोनूच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nanded Crime :
Published On
Summary
  • नांदेडमध्ये मॉर्निंग वॉकवेळी तरुणाची हत्या

  • चार जणांनी मिळून केला हल्ला

  • हत्येमागील धक्कादायक कारण समोर

नांदेड शहरात आज सकाळी मॉर्निक वॉकसाठी गेलेल्या सोनू कल्याणकर मानक चार जणांनी हल्ला केला. जुन्या वादातून सोनूवर हल्ला केल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता परंतु आता या हत्येप्रकरणी नाव खुलासा झाला आहे, हत्येमागील एक धक्कादायक कारण समोर आले आहे. मयत सोनू कल्याणकर याच्या वडिलांनी फिर्याद दिली असून आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Nanded Crime :
Crime News: प्रेम, विश्वासघात आणि हत्या! पत्नी-प्रियकराने मिळून रचला नवऱ्याच्या खुनाचा कट; हाताच्या गोंदणावरून पोलिसांनी लावला छडा

सोनू कल्याणकर याच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार, गोलू मंगनाळे आणि त्याचे वडील चंद्रविजय मंगनाळे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनू कल्याणकर यांनी मंगनाळे यांच्या मुलीचे लग्न मोडल्याचा खोटा आरोप करत हा वाद झाल्याचं तक्रारीत म्हटलंय.

अनिकेत उर्फ सोनू कल्याणकर याचे दहा-बारा वर्षापासून मंगनाळे यांच्या मुलीसोबत प्रेम संबंध होते. त्यांच्या या प्रेमसंबंधाला मंगनाळे पिता पुत्राचा विरोध होता. त्यानंतर मंगनाळे यांनी आपल्या मुलीचा विवाह दुसरीकडे ठरवला. मात्र सोनूने तिचा विवाह मोडला, असा आरोप करत २०२० मध्ये विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये आमच्या मुलाविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Nanded Crime :
मित्र झाला वैरी! डोक्यात दगड घालून मित्राला संपवलं; २४ तासात दोन खुनाच्या घटनांनी सांगली हादरलं

त्यानंतर, 2021 मध्ये गोलू मंगनाळे यांनी सोनू कल्याणकर याच्या घरी येत गोळीबार करत त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला. तेव्हापासून सोनूला मारण्यासाठी मंगनाळे पिता-पुत्र प्लॅन करत होते. 10-12 दिवसापूर्वीच जंगमवाडी परिसरात सोनू कल्याणकरला अडवून अंकुश गंधमवाड, पियु शिंदे, रोहित लोट आणि मधु जोगदंड यांनी तुझे दिवस भरले आहेत, नीट रहा असे म्हणत धमकावले होतं.

त्यावेळी सोनू कल्याणकरच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल करू असं सांगत होते. मात्र सोनू याने तक्रार द्यायला विरोध केला. गोलू मंगनाळे हा कुठल्या दहशतवादी हरविंदर सिंग रिंदाचा माणूस आहे. जर त्याच्याविरोधात तक्रार दिली तर ते मला नक्की मारतील म्हणून आपण तक्रार दाखल करायची नाही असं सोनून सांगितलं होतं, असं वडिलांनी आपल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com