मित्र झाला वैरी! डोक्यात दगड घालून मित्राला संपवलं; २४ तासात दोन खुनाच्या घटनांनी सांगली हादरलं

Sangli Crime News: दारूच्या नशेत झालेल्या वादानंतर एका व्यक्तीने दगडाने आपल्या मित्राची हत्या केल्याची घटना घडली आहे. २४ तासांत हत्येच्या दोन घटनांमुळे सांगली हादरली आहे.
Sangli Crime news
Sangli Crime newssaam tv
Published On
Summary
  • सांगलीत २४ तासांत दोन खुनांच्या घटनांनी खळबळ

  • कवलापूर येथे मित्राने मित्राचा दगडाने खून

  • दारूच्या नशेत झालेल्या वादातून घटना घडली

नांदेडनंतर सांगलीमध्ये हत्येची मालिका घडत आहे. गेल्या २४ तासात सांगली जिल्ह्यातील दोन हत्येच्या घटना घडली आहेत. सांगलीमधील कवलापूर येथे एका मित्रानेच आपल्या मित्राची हत्या केली आहे. यात्रेमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या विश्वास कलाप्पा सुतार या 32 वर्षे तरुणाच्या डोक्यात त्याच्याच मित्राने दगड घालून त्याचा खून केला. याप्रकरणी रोहित उर्फ नवनाथ श्रीरंग नाईक याला सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

Sangli Crime news
Nagpur Crime: नागपूर हादरलं! १४ वर्षीय अथर्व मनोरे हत्या प्रकरणात मित्रच निघाला मास्टरमाइंड, तीन आरोपी अटकेत

दारूच्या नशेत यात्रेमध्ये फिरताना धक्का लागल्याने दोघांमध्ये वाद झाला. एकमेकांना शिवीगाळ केली, त्यानंतर सुतारच्या मित्राने त्याच्या डोक्यात दगड घातला. तर कुपवाड मध्ये दगडू सुखदेव केंगार या 55 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पदरित्या मृतदेह मिळून आला आहे. दगडू केंगार हा इचलकरंजी येथे बांधकाम कामगार म्हणून काम करत होता.

Sangli Crime news
Crime News : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार; सोशल मीडियावर मैत्री करणं पडली महागात

दगडू केंगार याच्या अंगावर मारहाणीचे वळ उमटले आहेत. दगडू केंगार याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणातून झाला याचा तपास कुपवाड एमआयडीसी पोलीस करीत आहेत. दरम्यान त्याचा कुटुंबातीलच नातेवाईकांनी खून केल्याचा संशय असल्याने दगडू केंगार याच्या नातेवाईकांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान या लागोपाठ घडलेल्या घटनांमुळे मात्र खळबळ उडाली आहे. नांदेडनंतर सांगलीमध्ये हत्यांची मालिका सुरू आगहे. नांदेडमध्ये झालेल्या गँगवॉरमध्ये ५ जणांची हत्या झाली आहे. या वाढलेल्या गुन्हेगारीमुळे राज्यातील सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

पाच दिवसापूर्वीसुद्धा सांगलीमधील जुना कुपवाड रस्त्यावरील दुधाळ कॉर्नरजवळ हत्येची घटना घडली होती. सौरभ महादेव पवार (वय 22, रा. राजीवनगर, कुपवाड रस्ता, सांगली) या तरुणाचा दोघांनी पाठलाग करून निर्घृण खून केला होता. दरम्यान संशयित शाहीद समीर मुल्ला व आयान समीर भिस्ती (दोघे रा. राजीवनगर) या दोघांनी हा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. खुनानंतर हत्यार घेऊन पळणाऱ्या शाहीद मुल्ला याला पोलिसांनी पकडलं तर आयान पसार झाला होता. मृत सौरभ हा घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com