Crime News: प्रेम, विश्वासघात आणि हत्या! पत्नी-प्रियकराने मिळून रचला नवऱ्याच्या खुनाचा कट; हाताच्या गोंदणावरून पोलिसांनी लावला छडा

Agra murder case: आग्रा जिल्ह्यात पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. पोलिसांनी 24 तासांत तपास पूर्ण करत तीन आरोपींना अटक केली. अनैतिक संबंधातून घडलेल्या या गुन्ह्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Agra murder case
Agra murder casesaam tv
Published On

आग्रा जिल्ह्यातील सैंया परिसरात एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आलं आहे. यावेळी अनैतिक संबंधामुळे घडलेल्या या गुन्ह्याने परिसरात खळबळ उडवलीये. या घटनेमध्ये एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने तिच्या पतीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी केवळ 24 तासांत या प्रकरणाचा छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे.

ही घटना सैंया पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून 1 एप्रिल 2026 रोजी या गावातील लोकेंद्र हा अचानक बेपत्ता झाला होता. यावेळी कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली असता देवीसिंह पुरा मार्गावरील एका शेतात अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. मृतदेहाची ओळख लोकेंद्रचा भाऊ शिवचरणने केली.

Agra murder case
Nagpur Crime: नागपूर हादरलं! १४ वर्षीय अथर्व मनोरे हत्या प्रकरणात मित्रच निघाला मास्टरमाइंड, तीन आरोपी अटकेत

यावेळी शिवचरणने पोलिसांना सांगितलं की, शेवटचं त्याने लोकेंद्रला गावातील महेश प्रजापतीसोबत जाताना पाहिलं होतं. त्याचबरोबर लोकेंद्रची पत्नी आणि महेश यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.

Agra murder case
Crime news: घरचे बाहेर गेले असताना घरात घुसला अन्..; शेजारी राहणाऱ्या तरूणाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, राज्यात खळबळ

या माहितीच्या आधारावर आग्र्यामध्ये सैंया पोलीस ठाण्याच्या पाच संयुक्त पथकांची स्थापना करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल रेकॉर्ड यांच्या तपासातून पोलिसांनी 3 एप्रिल रोजी महेश प्रजापती, धर्मवीर आणि मृतकाची पत्नी यांना अटक केली. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. मृतदेहाची ओळख हातावर गोंदवलेल्या नावावरून करण्यात आली.

महेश प्रजापतीने दिली गुन्ह्याची कबुली

पोलिसांनी चौकशी केली असता मुख्य आरोपी महेश प्रजापतीने गुन्ह्याची कबुली दिली. लोकेंद्रला आपल्या पत्नीचे आणि महेशचे संबंध समजल्यामुळेच ही हत्या घडल्याचं समोर आलं. 1 एप्रिल रोजी लोकेंद्र घराबाहेर पडताच त्याच्या पत्नीने महेशला फोन करून माहिती दिली. त्यानंतर महेशने लोकेंद्रला रस्त्यात त्याच्या बाईकवर बसवलं आणि सोबत धर्मवीरलाही घेतलं. तिघांनी सैंया पुलाजवळून दारू खरेदी केली आणि लोकेंद्रला शांत ठिकाणी नेलं.

Agra murder case
Crime News: मामीचा कारनामा, १० वर्षे लहान भाच्यासोबत फुर्रर्रर्र...! मंदिरात जाते असं सांगून घरातून निघाली ती परतलीच नाही

त्या ठिकाणी आरोपींनी त्याचा गळा आवळून खून केला. पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेहावर पेट्रोल आणि गव्हाच्या पेंढ्या टाकून आग लावली. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत कारवाई केली आणि आरोपींना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com