दोघांच्या घट्ट मैत्रीचा भयानक शेवट, मित्राच्या आईला मेसेज केला; मोबाइल बघितल्यानंतर सटकलीच, झोपेतच दोस्ताला संपवलं

Friend Kills Friend Over Suspicion In Jalna Maharashtra: जालना जिल्ह्यातील शिरसवाडी येथे मित्रानेच मित्राचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आईला मेसेज पाठवल्याच्या संशयावरून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी आरोपीला काही तासांत अटक केली आहे.
Police investigation underway after a young man was brutally murdered by his friend in Jalna over suspicion.
Police investigation underway after a young man was brutally murdered by his friend in Jalna over suspicion.Saam tv
Published On

अक्षय शिंदे, साम टीव्ही

जालना: मित्रानेच मित्राचा काटा काढल्याची एक धक्कादायक घटना जालना तालुक्यातील शिरसवाडी घडली आहे. आईला मोबाईलवर मेसेज पाठवल्याच्या रागातून एका 25 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली. या प्रकरणी जालना तालुका पोलिसांनी संशयित आरोपीला अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या आहेत. निखिल वाघमारे (वय 25) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.

Police investigation underway after a young man was brutally murdered by his friend in Jalna over suspicion.
Yavatmal Crime: शेजाऱ्याच्या घरातील पोत्यात आढळला बेपत्ता ७ वर्षीय मुलीचा मृतदेह |Video

मिळालेल्या माहितीनुसार निखिल आणि आरोपी हे दोघेही एकमेकांचे जवळचे मित्र होते. दोघांचेही एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. मात्र निखिल हा त्याच्या आईला मोबाईलवर मेसेज पाठवतो, असा अल्पवयीन मुलाला संशय होता. याच संशयातून दोघांमध्ये वाद होता.

पार्टिनंतर झोपेत असतानाच केला वार

निखिल आणि आरोपीची शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास दोघांची एकत्र पार्टी झाली. त्यानंतर रात्री 11.30 ते 12 च्या सुमारास निखिल गाढ झोपेत असताना अल्पवयीन मुलाने संधी साधून त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की निखिलचा जागीच मृत्यू झाला.

Police investigation underway after a young man was brutally murdered by his friend in Jalna over suspicion.
Ambernath Crime: ऑफिसच्या बॉससोबत अफेअर, २ महिन्यांपूर्वी ब्रेकअप; शेवटचं भेटायला हॉटेलवर गेलेल्या तरुणीचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच जालना तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. आरोपी हा फरार होण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा बालक विधीसंघर्षित असून त्याची बालकारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Police investigation underway after a young man was brutally murdered by his friend in Jalna over suspicion.
Crime: केस धरून बेदम मारहाण, धारदार शस्त्राने गळा चिरला; नंतर कारखाली चिरडलं, बारामतीच्या महिलेची कर्नाटकात हत्या

शनिवारी सकाळी निखिलचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. त्यानंतर दुपारी शिरसवाडी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com