Ambernath Crime: ऑफिसच्या बॉससोबत अफेअर, २ महिन्यांपूर्वी ब्रेकअप; शेवटचं भेटायला हॉटेलवर गेलेल्या तरुणीचा मृत्यू

Ambernath Woman Died In Hotel: अंबरनाथमध्ये एका तरुणीने हॉटेलच्या खोलीमध्ये आत्महत्या केली. ऑफिसच्या बॉससोबत तिचे अफेअर होते. पण दोन महिन्यांपूर्वी त्यांचा ब्रेकअप झाला. शेवटचं भेटायला हॉटेलवर गेले असता तिने आयुष्य संपवलं.
Ambernath Crime: ऑफिसच्या बॉससोबत अफेअर, २ महिन्यांपूर्वी ब्रेकअप; शेवटचं भेटायला हॉटेलवर गेलेल्या तरुणीचा मृत्यू
Ambernath CrimeSaam Tv
Published On

Summary -

  • अंबरनाथमध्ये हॉटेलमध्ये तरुणीची आत्महत्या

  • ब्रेकअपमुळे नैराश्याची शक्यता

  • बॉयफ्रेंड तिला हॉटेलवर सोडून गेल्यानंतर घडली घटना

  • पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू

अजय दुधाणे, अंबरनाथ

अंबरनाथमध्ये बॉयफ्रेंडसोबत हॉटेलवर गेलेल्या एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. या तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. तिचे ऑफिसमधील बॉससोबत अफेअर होते पण काही दिवसांपूर्वी त्यांचा ब्रेकअप झाला होता. तिने बॉयफ्रेंडला शेवटचे भेटायचे असल्याचे सांगून बोलावले. दोघे भेटले पण तो तिला हॉटेलवरच सोडून निघून गेला. त्यानंतर या तरुणीने आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथमध्ये एका तरुणीनं हॉटेलच्या रुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. या तरुणीचं ऑफिसच्या बॉससोबत अफेअर होतं मात्र काही दिवसांपूर्वी त्यांचं ब्रेकअप झालं होतं. यानंतर शेवटचं भेटण्याची इच्छा असल्याने ते दोघे हॉटेलवर भेटले. पण तिचा बॉस तिला हॉटेलमध्चये सोडून निघून गेला. तो परत येईल याची ती वाट पाहत होती. पण तो परत न आल्यानं तिनं नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले आणि गळफास घेत आत्महत्या केली.

Ambernath Crime: ऑफिसच्या बॉससोबत अफेअर, २ महिन्यांपूर्वी ब्रेकअप; शेवटचं भेटायला हॉटेलवर गेलेल्या तरुणीचा मृत्यू
Crime News: आईचे ६५ वर्षांच्या म्हाताऱ्यासोबत अनैतिक संबंध, अडथळा ठरणाऱ्या मुलाची हत्या; २५ हजारांत दिली सुपारी

सिमरन पाटील असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव होतं. ती अंबरनाथच्या ग्लोब बिझनेस पार्कमधील विम्प्रो मॅनेजमेंट कन्सल्टंट्स कंपनीत अकाऊंटंट म्हणून काम करत होती. या कंपनीचा मालक भगवान लोटे याच्यासोबत तिचं २ वर्ष अफेअर होतं. मात्र २ महिन्यांपूर्वी त्यांचं ब्रेकअप झालं होतं. यानंतर एकदा शेवटचं भेटण्याची इच्छा असल्यानं तो तिला अंबरनाथच्या एका हॉटेलमध्ये घेऊन आला आणि तिला सोडून कामासाठी निघून गेला.

Ambernath Crime: ऑफिसच्या बॉससोबत अफेअर, २ महिन्यांपूर्वी ब्रेकअप; शेवटचं भेटायला हॉटेलवर गेलेल्या तरुणीचा मृत्यू
Crime News : "तू मला आवडतेस..." बीडमध्ये भररस्त्यात तरुणीचा विनयभंग; ओढणी ओढली अन्...

भगवान लोटे परत येईल, याची वाट बघत सिमरनने त्याला अनेक कॉल केले. पण भगवान लोटेने तिचे फोन न उचलल्यानं तिने नैराश्यात गळफास घेत आत्महत्या केली. यानंतर भगवान लोटे परत आला असता तिने दरवाजा न उघडल्याने त्याने हॉटेल स्टाफच्या मदतीने दरवाजा उघडला असता सिमरन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यामुळे हॉटेल स्टाफने पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. तसंच भगवान लोटे याची रात्री अडीच वाजेपर्यंत चौकशी केली. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून काय कारवाई होते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Ambernath Crime: ऑफिसच्या बॉससोबत अफेअर, २ महिन्यांपूर्वी ब्रेकअप; शेवटचं भेटायला हॉटेलवर गेलेल्या तरुणीचा मृत्यू
Mumbai Crime: मुंबईत पोलिसावर हल्ला, मद्यधुंद तरुणाने आधी शिवीगाळ केली नंतर...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com