Mumbai Crime: मुंबईत पोलिसावर हल्ला, मद्यधुंद तरुणाने आधी शिवीगाळ केली नंतर...

Attack On Mumbai Police: मुंबईत एका मद्यधुंद तरुणाने पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना मुंबईतल्या साकीनाकामध्ये घडली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतलं.
Mumbai Crime: मुंबईत पोलिसावर हल्ला, मद्यधुंद तरुणाने आधी शिवीगाळ केली नंतर...
Mumbai CrimeSaam Tv
Published On

Summary -

  • मुंबईतल्या साकीनाक्यामध्ये पोलिसावर हल्ला

  • मद्यधुंद तरुणाने शिवीगाळ करत केली मारहाण

  • पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात

  • पुढील तपास सुरू

संजय गडदे, मुंबई

मुंबईत पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. साकीनाका परिसरात मद्यधुंद अवस्थेत एका व्यक्तीने पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. त्यानंतर त्याने सरकारी मालमत्तेची तोडफोड केली. या घटनेमुळे साकिनाक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी प्रशांत इंगळे याच्याविरोधात साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सुमारे १:१० वाजता पोलिस नियंत्रण कक्षाला एका महिलेने फोन करून तिचा पती मद्यधुंद अवस्थेत तिला मारहाण करत असल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर साकिनाका पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या वेळी महिलेचा पती तिला मारहाण करत असल्याचे पोलिांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला.

Mumbai Crime: मुंबईत पोलिसावर हल्ला, मद्यधुंद तरुणाने आधी शिवीगाळ केली नंतर...
Mumbai: मुंबईकरांनो सावधान! तुम्ही पिताय ते दूध निकृष्ट दर्जाचे? तब्बल ११ हजार लिटर दूध जप्त

पोलिस घटनास्थळी पोहोचताच प्रशांत इंगळे हा गोंधळ घालत असल्याचे दिसून आले. त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असताना त्याने कर्तव्यावर असलेल्या पोलिस शिपायाला शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचा वॉकीटॉकी हिसकावून घेतला. आरोपीने प्रदीप पाटील या पोलिस शिपायावर हल्ला केला. या घटनेमुळे काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण होते.

Mumbai Crime: मुंबईत पोलिसावर हल्ला, मद्यधुंद तरुणाने आधी शिवीगाळ केली नंतर...
Mumbai Tourism : उन्हाळ्यात घ्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद; थंडगार पाण्यात येईल मजा, मुंबईजवळ लपलंय 'हे' सुंदर ठिकाण

या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, पोलिसांवर हल्ला करणे आणि सरकारी मालमत्तेची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साकीनाका पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

Mumbai Crime: मुंबईत पोलिसावर हल्ला, मद्यधुंद तरुणाने आधी शिवीगाळ केली नंतर...
Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! झोपड्यांना भीषण आग, एकापोठापाठ एक सिलिंडरचा स्फोट; ३ जणांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com