Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! झोपड्यांना भीषण आग, एकापोठापाठ एक सिलिंडरचा स्फोट; ३ जणांचा मृत्यू

Bhayandar Fire Tragedy 3 Dead: भाईंदर पूर्वमध्ये झोपड्यांना भीषण आग लागली. शुक्रवारी रात्री ८ वाजता ही घटना घडली. या आगीमध्ये होरपळून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आग लागण्याचे कारण अद्याप समोर आले नाही.
Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! झोपड्यांना भीषण आग, एकापोठापाठ एक सिलिंडरचा स्फोट; ३ जणांचा मृत्यू|
Mumbai Fire Saam Tv
Published On

Summary -

  • भाईंदरमध्ये झोपडपट्टीत भीषण आग

  • सिलिंडर स्फोटांमुळे आग वाढली

  • ३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

  • पोलिस आणि अग्निशमन दलाचा तपास सुरू

मनोज तांबे, मिरा-भाईंदर

भाईंदरमध्ये अनधिकृत झोपड्यांना लागलेल्या भीषण आगीमध्ये ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक लोधा कॉम्प्लेक्सच्या मागील मोकळ्या जागेत असलेल्या झोपड्यांना शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये अनेक जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आगीमध्ये परिरात धुराचे लोट पसरले होते त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.

मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर पूर्वेतील इंद्रलोक येथील लोधा कॉम्प्लेक्सच्या मागील मोकळ्या जागेत असलेल्या झोपड्यांना शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीमध्ये तिघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि स्थानिक नवघर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत काही तासांत आगीवर नियंत्रण मिळवले.

प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केले आणि परिसरात मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ पसरले होते. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. ज्या ठिकाणी आग लागली होती त्या ठिकाणी अनेक सिलेंडर ठेवण्यात आले होते. आग लागल्यानंतर झोपड्यांमधील एक एक सिलिंडरचा स्फोट झाला त्यामुळे आग वाढत गेली.

दरम्यान, या आगीत अनेक वाहने देखील जळून खाक झाली असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर साठवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे आगीची तीव्रता अधिक वाढल्याचे सांगितले जात आहे. आगीमध्ये जखमी झालेल्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समोर आले नाही. पोलिस सध्या तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com