Mumbai Tourism : उन्हाळ्यात घ्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद; थंडगार पाण्यात येईल मजा, मुंबईजवळ लपलंय 'हे' सुंदर ठिकाण

Shreya Maskar

उन्हाळी सहल

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईजवळ फिरण्याचा प्लान करत असाल तर दिवेआगर समुद्रकिनारा उत्तम लोकेशन आहे. जेथे तुम्ही शहराच्या धावपळीतून निवांत वेळ घालवू शकता.

Summer Getaway | yandex

रायगड

दिवेआगर समुद्रकिनारा रायगड जिल्ह्यात स्थित आहे, जो महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील एक अत्यंत लोकप्रिय, स्वच्छ आणि शांत पर्यटन स्थळ आहे. हा पांढऱ्या वाळूचा किनारा आहे, जो नारळ आणि सुपारीच्या झाडांनी वेढलेला आहे.

Raigad | yandex

दिवेआगर समुद्रकिनारा

दिवेआगर समुद्रकिनारा जलक्रीडांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच तो मुंबईपासून साधारण १७० किमी आणि पुण्यापासून १६० किमी अंतरावर आहे.

Diveagar Beach | yandex

जलक्रीडांचा आनंद

दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर जेट स्कीइंग , बनाना राईड , बंपर राईड , पॅरासेलिंग आणि मोटरबोट राईड यांसारख्या जलक्रीडांचा आनंद घेता येतो.

Water Sports | yandex

सूर्यास्त

दिवेआगर बीचवरून तुम्ही सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. जेथे तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट करू शकता.

Sunset | yandex

पर्यटन स्थळे

दिवेआगर बीच जवळील सुवर्णगणेश मंदिर, रूपनारायण मंदिर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन बीच, मुरुड जंजिरा किल्ला आणि भंडारवाडा ही पर्यटन स्थळे आहेत.

Murud Janjira Fort | google

खाद्यसंस्कृती

दिवेआगर बीचला गेल्यावर तुम्हाला कोकणी आणि मालवणी सीफूड खायला मिळेल. उन्हाळ्यात येथे थंडगार वातावरण अनुभवता येते.

Delights | yandex

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Beach | yandex

NEXT : पांढरी वाळू अन् नारळाच्या बागा; कोकणातील ५ रमणीय समुद्र किनारे, प्लान करा Summer ट्रिप

Konkan Tourism | saam tv
येथे क्लिक करा...