Shreya Maskar
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कुटुंबासोबत कोकण ट्रिप प्लान करा. येथे अनेक हिडन बीच आहेत. जे तुम्ही कधी पाहिले नसतील.
रत्नागिरी कशेळी येथे देवघळी बीच वसलेला आहे. हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेले एक ठिकाण पाहून तुम्ही भारावून जाल. येथे फोटोशूटचा आनंद घेता येतो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात असलेला भोगवे बीच वसलेला आहे. पांढरी शुभ्र वाळू, नीलमणी रंगाचे पाणी आणि कर्ली नदीचा समुद्राशी होणारा संगम हे या किनाऱ्याचे प्रमुख आकर्षण आहे.
दापोली येथे पांढऱ्या वाळूसाठी प्रसिद्ध असलेला आंजर्ले बीच आहे. शांत, पांढरी वाळूचालांब पट्टा, नारळाच्या झाडांनी वेढलेला किनारा हे पाहण्यासाठी पर्यटक येते येतात.
सिंधुदुर्ग येथे निवती बीच आहे. निवती बीच 'मिनी मालदीव' म्हणून ओळखला जातो. निवती बीचवर बोटींगचा आनंद घेता येतो.
दापोली तालुक्यातील आंजर्ले गावाजवळ सावणे बीच हा स्वच्छ, शांत आणि निसर्गरम्य किनारा आहे. जिथे निळेशार पाणी, पांढरी वाळू आणि नारळ-पोफळीच्या बागा पाहण्यासारख्या आहेत.
रत्नागिरी येथे वेळणेश्वर बीच वसलेला आहे. हा एक खडकाळ आणि वालुकामय समुद्रकिनारा आहे, जिथे कमी गर्दी असते आणि जवळच एक ऐतिहासिक शिवमंदिर (वेळणेश्वर मंदिर) आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.