Shreya Maskar
उन्हाळ्यात ऐतिहासिक ठिकाणी ट्रिप प्लान करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या इतिहासाची उजळणी होईल.
राजगड किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे शहराच्या नैऋत्येस सुमारे ६०-६५ किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. हा एक ऐतिहासिक गिरीदुर्ग आहे.
राजगड किल्ला ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याची पहिली राजधानी होती. तब्बल २६ वर्षे हा किल्ला स्वराज्याचे मुख्य केंद्र होता. त्यानंतर राजधानी रायगड झाली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४७ च्या सुमारास मुरुंबदेव किल्ला जिंकून त्याचे 'राजगड' असे नामकरण केले आणि आपली पहिली राजधानी म्हणून स्थापन केली.
राजगड किल्ल्याला 'गडांचा राजा' म्हणून ओळखले जाते. त्याच्या अभेद्य दुर्गम रचनेमुळे त्याला 'गडांचा राजा' म्हटले जाते.
राजगड किल्ला हा सह्याद्रीच्या पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून अंदाजे ४,५१४ फूट उंचीवर वसलेला आहे. या किल्ल्यावर ट्रेकिंगला आवर्जून जा.
राजगड किल्ला हा त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्मावती माची, सुवेळा माची आणि संजीवनी माची या तीन प्रमुख माच्यांसाठी (पठार) अत्यंत प्रसिद्ध आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.