Palghar Tourism : पालघरजवळील 'या' किल्ल्यांना एकदा भेट द्याच; समुद्र, हिरवळ अन् निसर्ग सौंदर्य पर्यटकांना खुणावते

Shreya Maskar

शिरगाव किल्ला

शिरगाव किल्ला हा जलदुर्ग आहे. इ.स. १२२५ मध्ये यादव काळात बांधला गेला. नंतर गुजरात सुल्तान, बहामनी, पोर्तुगीज आणि मराठे यांच्या ताब्यात होता.

Shirgaon Fort | google

अर्नाळा किल्ला

अर्नाळा किल्ला देखील एक जलदुर्ग आहे. इ.स. १५१६ मध्ये सुलतान महमूद बेगडा यांनी बांधला. मराठा व पोर्तुगीज इतिहासाशी संबंधित आहे. येथे भवानी देवी, महादेवाचे मंदिर आहे.

Arnala Fort | google

वसई किल्ला

वसई किल्ला हा भव्य भुईकोट किल्ला आहे. इतिहासातील महत्त्वाचा 'वसई तह' येथे झाला.

Vasai Fort | google

अशेरीगड

अशेरीगड हा डोंगरी किल्ला आहे. शिलाहार काळात बांधला गेला, नंतर पोर्तुगीजांनी ताबा घेतला. अशेरीगड ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे.

Asherigad | google

टकमक किल्ला

टकमक हा डोंगरी किल्ला आहे. येथे ट्रेकिंगचा थरार अनुभवता येतो. पोर्तुगीजांकडून मराठ्यांनी १७३९ मध्ये जिंकला.

Takmak Fort | google

केळवे किल्ला

केळवे किल्ला १६व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधला होता. पालघर जिल्ह्यातील केळवे बीचजवळ हा किल्ला त्यांच्या सागरी व्यापाराचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाचा सागरी किल्ला होता.

Kelwe Fort | google

कोहोज किल्ला

कोहोज किल्ला हा डोंगरी किल्ला आहे. सुमारे ८०० वर्ष जुना हा किल्ला मराठा आणि ब्रिटिश काळात महत्त्वाचा टप्पा आहे.

Kohoj Fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Palghar | google

NEXT : सात भक्कम दरवाजे अन्..., 'या' ऐतिहासिक ठिकाणी छत्रपती शिवरायांनी घडवलाय इतिहास

Pune Fort | saam tv
येथे क्लिक करा...