Shreya Maskar
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये किल्ल्यावर भटकंती करायला नक्की जा. मुंबईजवळ एक खास ऐतिहासिक ठिकाण लपलेले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर जवळील एक ऐतिहासिक ठिकाण आहे.
शिवनेरी किल्ला हा १७ व्या शतकात बांधला गेला. शिवनेरी किल्ल्यावर मुख्यत्वे शिवजयंती (शिवजन्मोत्सव) हा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.
शिवनेरी किल्ला पुण्यापासून अंदाजे ९०-९५ किमी आणि मुंबईपासून १५० किमी अंतरावर आहे. त्यामुळे लहान मुलांसोबत तुम्ही येथे वीकेंड ट्रिप नक्कीच प्लान करू शकता.
शिवनेरी किल्ल्याजवळ लेण्याद्री लेणी, ओझरचे अष्टविनायक मंदिर आणि माळशेज घाट यांचा समावेश आहे. माळशेज घाटावरून निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
शिवनेरी हा सात दरवाजे असलेला एक लष्करी दुर्ग आहे. हा एक अभेद्य दुर्ग आहे. गडाच्या संरक्षणासाठी सात मजबूत दरवाजे, कड्यावरून नैसर्गिक तटबंदी बांधली आहे.
शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे जन्म स्मारक, शिवाई देवीचे मंदिर, बदामी तलाव आहे. शिवनेरी किल्ल्यावरून सह्याद्री पर्वतरांगेचे नयनरम्य दृश्य दिसते.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.