Shreya Maskar
रायगड किल्ला हा महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक गिरीदुर्ग आहे. हे इतिहासातील सर्वात महत्त्वाचे ठिकाण आहे. हा किल्ला महाड, मुंबई आणि पुणे या शहरांच्या जवळ वसलेला आहे.
रायगड रोप-वेच्या माध्यमातून रायगड किल्ल्यावर सहजपणे पोहोचता येते. रायगड किल्ला हे इतिहासातील प्रसिद्ध ठिकाण आहे. लहान मुलांसोबत सुट्टीत या ऐतिहासिक ठिकाणाला नक्की भेट द्या.
रायगड किल्लाजवळ गंगासागर तलाव, हिरकणी बुरुज, कर्नाळा पक्षी अभयारण्य, अवचितगड, लिंगाणा आणि प्रतापगड यांसारखे किल्ले आहेत. हे किल्ले खास ट्रेकिंगसाठी ओळखले जातात.
रायगड किल्ला हा प्रामुख्याने मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखला जातो. याच ठिकाणी १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला होता.
रायगड किल्ला सह्याद्री पर्वतरांगेत २,७०० फूट उंचीवर वसलेला आहे. जो त्याची अभेद्य रचना आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची १७ व्या शतकातील ऐतिहासिक राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर 'महा दरवाजा', सिंहासनाच्या प्रतिकृतीसह असलेला 'दरबार', गंगासागर तलाव आणि शिवाजी महाराजांची समाधी यांसारखी प्रमुख आकर्षणे आहेत.
रायगड किल्ला 'गडांचा राजा' आणि 'पूर्वेकडील जिब्राल्टर' असेही म्हणतात. रायगड किल्ल्यावरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.