Shreya Maskar
तुम्ही लहान मुलांसाठी ट्रिप प्लान करत असाल तर कर्नाळा पक्षी अभयारण्य बेस्ट ऑप्शन आहे. येथे प्राणी-पक्षी जवळून पाहायला मिळतात. लहान मुलांना याची आवर्जून ओळख करून द्या.
कर्नाळा किल्ला कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या मध्यभागी स्थित आहे. हे ठिकाण ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. मित्रांसोबत येथे ट्रेकिंग प्लान करा.
ट्रेकिंगचा थरार अनुभवायचा असेल तर कलावंतीण दुर्गला भेट द्या. हा किल्ला 'प्रबळगड'च्या जवळ आहे. हे साहसी ट्रेकचे ठिकाण आहे.
पनवेलमधील अदाई धबधबा हे हिडन लोकेशन आहे. येथे तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात भन्नाट फोटोशूट करू शकता. उंचावरून कोसळणारे पांढरे शुभ्र पाणी पाहून तुमचे मन भारावून जाईल.
गाढेश्वर धरण सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत, माथेरानच्या पायथ्याशी वसलेले आहे. निर्सगरम्य वातावरण, धबधबे आणि तलावामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी ट्रिपासाठी खास आहे.
प्रबळगड हा किल्ला 'मुरंजन' नावानेही ओळखला जातो. हा त्याच्या साहसी चढाईसाठी ओळखला जातो. हिवाळ्यात येथे ट्रेकिंगला जाऊ शकता. कारण पावसाळ्यात धोका जास्त असतो.
माणिकगड किल्ला हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. तुम्हाला घनदाट जंगलातून ट्रेक करायचा असेल तर माणिकगड किल्ल्याला नक्की भेट द्या.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.