हृदयद्रावक! बायकोच्या त्रासाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या; 1100 शब्दांच्या पोस्टमधून सांगितल्या २ वर्षांच्या वेदना

Beed Parli Suicide Facebook Post Full Story: बीडच्या परळी तालुक्यातील नागापुर येथे एका व्यक्तीने पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
A tragic scene unfolds in Beed as a man dies by suicide after sharing an emotional Facebook post detailing prolonged mental harassment.
A tragic scene unfolds in Beed as a man dies by suicide after sharing an emotional Facebook post detailing prolonged mental harassment.Saam Tv
Published On

योगेश काशीद, साम टीव्ही

बीडच्या परळी तालुक्यातील नागापुर येथील रामेश्वर गव्हाणे यांनी आपल्या मळ्यात औषध घेऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना घडली आहे. रामेश्वरने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर पोस्ट केली. यामध्ये त्याने त्याची पत्नी आणि नतेवाईकांपासून त्रास असल्याचे लिहिले आहे. तसेच त्याने या पोस्टमध्ये काही डॉक्टर आणि वकिलांच्या नावाचा देखील उल्लेख केला आहे. फेसबुक पोस्टनंतर त्याच्याशी अनेकांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. काही वेळातच त्याच्या आत्महत्येचे वृत्त समोर आले. या आत्महत्या केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

A tragic scene unfolds in Beed as a man dies by suicide after sharing an emotional Facebook post detailing prolonged mental harassment.
पुण्यात मारले अन् बीडमध्ये अंत्यविधीला नेलं, आईनेच घेतला पोटच्या लेकराचा जीव, धक्कादायक कारण समोर

रामेश्वर आपल्या पोस्टमध्ये म्हणाला, आई आणि सुरेखा मला माफ करा मी जे गेल्या दोन वर्षांपासून सहन करतो आहे. ते मनाला खूप वेदना देणारे आहे. त्यामुळे मी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. माझ्या बायकोच्या नम्रता जाधव हिच्या त्रासाला कंटाळून मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे. गेल्या दोन वर्षांपासून ती माझा प्रचंड मानसिक छळ करत आहे. सद्या ती म्हणत आहे की, मी गरोदर आहे. सात आठवड्याची गरोदर आहे. तिचे उपचार आई नर्सिंग होम अंबाजोगाई येथे सुरू आहेत. तेथील डॉ. सुनिता तोंडगे यांनी बाळाचे टोके सुरू झाले आहेत असे आजच म्हटले आहे. तसा रिपोर्ट दिला आहे. पण तो खोटा रिपोर्ट आणि फेक उपचार त्या करत आहेत. डॉक्टरांना मॅनेज करून माझी बायको माझी फसवणूक करत आहे.

वर्षा मराठे गव्हाणे यांनी तिला या कामात मदत केली आहे. परळीच्या गुघे मॅडम यांचे आणि डॉ सुनिता तोंडगे आणि डॉ.गणेश तोंडगे यांच्याकडे सेटिंग लावून ती माझी फसवणूक करत आहे. कारण उद्या जर मी कोर्टात धाव घेतली तर म्हणता येत मुलं राहिलं होतं नंतर गर्भपात झाला. म्हणजे वंध्यत्वाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ती परत आली आहे‌. त्यामुळे आजच माझ्या बायकोची सोनोग्राफी करावी आणि आरोग्य विभागात सुरू असलेला गैरप्रकार थांबवावा ही नम्र विनंती. या प्रकरणातील खोटे रिपोर्ट देणाऱ्या सर्व डॉक्टरांवर सखोल चौकशी करून कारवाई करावी. अशी मागणी त्याने केली आहे.

कवितेतून केले दु:ख व्यक्त

केली शिकार माझी, माझ्याच सद्गुणांनी,

काटे कुठेच नव्हते, केला दगा फुलांनी!!

मी बोललोच नव्हतो, माझ्या व्यथा कुठेही

सांगुन टाकल्या पण, माझ्याच आसवांनी !!

नेकीस आज माझ्या काहीच अर्थ नव्हता,

मी बेईमान ठरलो, लोकात बेईमानी!!

मी सत्य बोललो अन भलते घडुन गेले,

दुश्मन बनुन गेले माझेच दोस्त जानी!!

विश्वास वाटल्यावर, विश्वास ठेवला मी

त्यानीच कापला की, माझा गळा नखांनी !!

हे लाचखोर गेले देशा करुन स्वाहा,

गेले कुठे कळेना देशातले इमानी ?

गाफील राहीलो मी, त्या नेमक्या क्षणाला,

मागून वार केले, माझ्याच माणसानी!!

दोस्तासमान माझे सुख बेईमान झाले,

अद्याप दु:ख आहे, शत्रूपरी इमानी!!

विसरुन जावयाचा अधिकार तुज असावा,

त्याच्या मुळेच सहजी, ही संपली कहाणी !!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com