Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; आई-वडील, बहिणीनंतर आणखी एका जवळच्या व्यक्तीचे निधन

Famous Actress Passing Of A Loved One : मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे. अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Famous Actress Passing Of A Loved One
Famous ActressSAAM TV
Published On
Summary

प्रसिद्ध अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला.

अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले.

अभिनेत्रीने काही वर्षांपूर्वी आपल्या आई, वडील आणि बहिणीला गमावले होते.

प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ति (Suchitra Krishnamoorthi) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या भावाचे निधन झाले आहे. काही वर्षांपूर्वीच त्यांनी आपली मोठी बहीण आणि आई-वडिलांनाही गमावले होते. त्यांनी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मनोरंजन विश्वातील कलाकारांनी, चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी त्यांच्या भावावर श्रद्धांजली वाहिली आहे.

सुचित्रा कृष्णमूर्ति यांनी सोमवारी सोशल मीडियावर ही दुःखद बातमी शेअर करत शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले की, "माझे आई-वडील व्यंकटनरसिंह कृष्णमूर्ती, डॉ. सुलोचना कृष्णमूर्ती, माझी बहीण सुजाता कुमार आणि माझा भाऊ डॉ. सुधाकर कृष्णमूर्ती, मी नेहमीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली असेन..." तसेच अभिनेत्रीने पोस्टला भावुक कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "आज Dedication Page अपडेट करत आहे...मला हे इतक्या लवकर करावे लागेल, असे कधीच वाटले नव्हते..."

सुचित्रा कृष्णमूर्ति कोण?

मीडिया रिपोर्टनुसार, सुचित्रा कृष्णमूर्ती या आपल्या कुटुंबासोबत हैदराबादमध्ये राहत होत्या. गेल्या काही वर्षांत या अभिनेत्रीने अनेक मोठ्या दुर्दैवी घटनांचा सामना केला आहे. तिची बहीण आणि अभिनेत्री सुजाता कुमार यांचे २०१८ मध्ये कर्करोगाशी झुंज देताना निधन झाले. सुजाता 'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटात श्रीदेवीच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारण्यासाठी ओळखली जात होती. सुचित्राने काही वर्षांपूर्वी आपल्या आई-वडिलांनाही गमावले आहे.

Famous Actress Passing Of A Loved One
Arjun Kapoor : "शेवट स्वीकारा..."; अर्जुन कपूरला नेमकं झालं काय? क्रिप्टिक पोस्ट चर्चेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com