

ऑस्ट्रेलियातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आलीये. मेलबर्नमधील फर्नट्री गली परिसरात क्रिकेट सरावादरम्यान १७ वर्षीय युवा क्रिकेटपटू बेन ऑस्टिन याच्या डोक्यावर चेंडू लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी संध्याकाळी वॉली ट्यू रिजर्व मैदानावर घडली. याठिकाणी बेन एका टी२० सामन्याच्या तयारीसाठी नेटमध्ये सराव करत होता.
बेन ऑस्टिन एटोमॅटिक बॉलिंग मशीनवर सराव करत असताना चेंडू डोक्यावर लागला. त्याने हेल्मेट घातलं होतं. मात्र चेंडूचा वेग इतका होता की तो गंभीर जखमी झाला. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले आणि लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले. मात्र बुधवारी त्याचा मृत्यू झाला.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, या घटनेचा सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सुरुवातीला वाटलं की साधी दुखापत आहे, पण जेव्हा डिफिब्रिलेटर मागवण्यात आला, तेव्हा समजलं की परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. दोन्ही टीमधील खेळाडू बेनला ओळखत होते, त्यामुळे सर्वचजण फार चिंतेत होते.
फर्नट्री गली क्रिकेट क्लबने आपल्या खेळाडूच्या अकाली निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. क्लबचे अध्यक्ष आर्नी वाल्टर्स म्हणाले, “बेन हा एक प्रतिभावान क्रिकेटपटू होता. त्याच्या जाण्याने संपूर्ण क्रिकेट समुदायावर गंभीर परिणाम होईल. आम्ही आमच्या क्लब आणि क्रिकेट कुटुंबाला सर्वतोपरी मदत करू.”
ही घटना २०१४ मध्ये फिलिप ह्यूजच्या निधनानंतर १० वर्षांनी घडली आहे. त्यावेळी जेव्हा शेफील्ड शील्ड सामन्यात फिलिपचा मानेवर चेंडू लागल्यामुळे मृत्यू झाला होता. त्यावेळी संपूर्ण क्रिकेट विश्वाला धक्का बसला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.