IND vs AUS: पहिल्या टी20 सामन्यात फलंदाजांची जादू चालणार की गोलंदाज गाजवणार वर्चस्व? पाहा कसा आहे कॅनबेरा पिच रिपोर्ट

IND vs AUS Pitch Report: वनडे सिरीजमधील पराभवानंतर टीम इंडिया T20 फॉरमॅटमध्ये दमदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, या हाय-व्होल्टेज सामन्यात फलंदाज वर्चस्व गाजवतील की गोलंदाज नियंत्रणात ठेवतील, हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.
IND vs AUS Pitch Report
IND vs AUS Pitch Reportsaam tv
Published On

वनडे सिरीजनंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी२० सामन्यांची रोमांचक सिरीज सुरू होणार आहे. आजपासून या सिरीजला सुरुवात होणार असून पहिला सामना कॅनबरामधील मानुका ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. ही सिरीज २०२६ फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या टी२० वर्ल्डकपच्या तयारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जातेय. यावेळी दोन्ही टीम्सना या सिरीजमधून स्वतःच्या ताकदी आणि कमतरता यांची जाणीव होण्यास मदत होणार आहे.

IND vs AUS Pitch Report
Suryakumar Yadav: श्रेयस अय्यरची तब्येत कशीये? पत्रकार परिषदेत सूर्यकुमारने दिली महत्त्वाची अपडेट

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीम्स टी२० वर्ल्डकप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानल्या जातायत. त्यामुळे ही सिरीज स्पर्धात्मक होण्याची शक्यता आहे. ५ सामन्यांच्या सिरीजमधील पहिल्या सामन्यातील पीच कसं आहे हे जाणून घेऊया.

मनुका ओव्हलचा पिच रिपोर्ट

कॅनबरामधील मनुका ओव्हलचं पिच फलंदाजांसाठी अनुकूल मानण्यात येतंय. या पिचवर मोठी स्कोर होण्याची शक्यता असते. यावेळी पहिल्या डावाचा सरासरी स्कोअर या मैदानावर सुमारे १५० रन्स आहे. पिच थोडी गतीमान असल्यामुळे जलदगती गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते, पण एकूणच पिच फलंदाजांना अधिक फायदेशीर ठरते.

या मैदानावर टॉस जिंकणारी टीम संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकते. याचं कारण म्हणजे कारण पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या टीम्सने १० सामने जिंकले आहेत. या मैदानावरचा सर्वोच्च स्कोअर १९५ रन्स आहे. हा स्कोर दक्षिण आफ्रिकेच्या महिला टीमने केला होता. एकूण २२ टी२० सामने या मैदानावर खेळले गेले आहेत, ज्यात पहिल्या फलंदाजीने १० आणि दुसऱ्या फलंदाजीने ९ सामने जिंकले गेले आहेत.

IND vs AUS Pitch Report
India Playing 11 Prediction : भारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी २० मॅच कधी, कुठे आणि कशी असेल संभाव्य प्लेइंग ११?

कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग ११

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, रिंकू सिंह, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह

IND vs AUS Pitch Report
Shreyas Iyer Surgery : श्रेयस अय्यरवर शस्त्रक्रिया, नेमकं काय झालं होतं? कधी मिळणार हॉस्पिटलमधून डिस्चार्ज?

ऑस्ट्रेलियाची प्लेईंग ११

ट्रेविस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिश (विकेटकीपर), टिम डेविड, मार्कस स्टॉयनिस, मिचेल ओवन, सीन एबॉट, नाथन एलिस, मॅथ्यू कुहनमॅन, जोश हेजलवुड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com