

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडे सामन्यानंतर आता टीम इंडियाला ५ सामन्यांची टी-२० सिरीज खेळायची आहे. उद्यापासून म्हणजेच बुधवारपासून या सिरीजला सुरुवात होणार आहे. टी २० टीमचा कर्णधार सूर्यकुमार यादवने श्रेयस अय्यरच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. २५ ऑक्टोबर शनिवार रोजी सिडनीतील शेवटच्या वनडे सामन्यात कॅच घेताना श्रेयसच्या बरगडींना दुखापत झाली होती. नंतरच्या स्कॅनमध्ये गंभीर दुखापत आढळून आली.
मंगळवारी होणाऱ्या पहिल्या टी २० सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना सूर्यकुमार म्हणाला, “तो चांगल्या प्रकारे बरा होतोय. तो आमच्या फोनला उत्तर देतोय, म्हणजे त्याची प्रकृती स्थिर आहे. जे घडलं ते दुर्दैवी होतं, पण डॉक्टर त्याची नीट काळजी घेत आहेत. पुढील काही दिवस त्याच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. पण चिंतेचं काही कारण नाही.”
दैनिक जागरणच्या अहवालानुसार, आयसीसी वैद्यकीय समितीचे प्रमुख डॉ. दिनशॉ परडीवाला, जे BCCI मेडिकल पॅनेल आणि कोकिलाबेन धीरूभाई अंबानी स्पोर्ट्स मेडिसिन सेंटरचे प्रमुख आहेत, यांना सिडनीहून श्रेयसचे मेडिकल रिपोर्ट्स पाठवण्यात आलेत. रिपोर्ट्स तपासल्यानंतर त्यांनी BCCI ला मेल केलाय. ज्यामध्ये शेवटच्या मुद्द्यात स्पष्टपणे नमूद केलंय की, BCCI च्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी श्रेयसचे प्राण वाचवलेत.
PTI च्या अहवालानुसार, श्रेयस मैदानातून परतल्यानंतर अचानक कोसळला होता आणि त्याचे vital signs धोकादायक पातळीवर पोहोचले होते. BCCIच्या वैद्यकीय टीमने वेळ न घालवता त्याची स्थिती स्थिर केली. Cricbuzzच्या अहवालानुसार, श्रेयसची प्रकृती नाजूक पण स्थिर आहे आणि त्याला ICUमधून हलवण्यात आलंय.
टीम इंडियाचा पुढील दौरा दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे सिरीज आहे. ही सिरीज जी ३० नोव्हेंबरपासून रांचीमध्ये सुरू होणार आहे. मात्र श्रेयसच्या दुखापतीमुळे त्याचं टीममध्ये कमबॅक होण्याची शक्यता कमी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.